मुंबई : मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने राज्यासाठी पुढील तीन दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला असून, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी जो
मुंबई : मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने राज्यासाठी पुढील तीन दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला असून, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेता विविध जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आज सोमवार ०३ ऑगस्ट रोजी रत्नागिरी, सातारा घाट परिसर, बुलढाणा, अकोला, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. उद्या मंगळवार ०४ ऑगस्ट रोजी बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना व विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर बुधवार ०५ ऑगस्ट रोजी बुलढाणा, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
नागरिकांनी विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाच्या काळात आवश्यक ती खबरदारी घ्यावी, सुरक्षित ठिकाणी आश्रयाला जावे तसेच स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.

COMMENTS