Homeताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरात मुलाकडून वडिलांची हत्या

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरात पोटच्या मुलानेच वडिलांचा जीव घेतल्याचा प्रकार बाबर कॉलनीत घडला. मती शेख असे मृताचे नाव आहे. संशयित आरोपी

राष्ट्रहित की अपयशी व्यवस्थेची कबुली?
तहसीलदारांनी गावात जाऊन जनतेचे प्रश्‍न सोडवावेतमहसूल मंत्री बावनकुळे यांचे निर्देश ; करमाळ्यात सह दुय्यम निबंधक कार्यालयाचे उद्घाटन
शिक्षणमंत्र्यांविरोधात चप्पल मारणारे अनोखे यंत्र; नागपुरातील सुशिक्षित तरुणांच्या या ‘अहिंसक’ आंदोलनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल!
छत्रपती संभाजीनगरात मुलाकडून वडिलांची हत्या: आरोपी फरार, शोधासाठी पथके  रवाना - Chhatrapati Sambhajinagar News

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरात पोटच्या मुलानेच वडिलांचा जीव घेतल्याचा प्रकार बाबर कॉलनीत घडला. मती शेख असे मृताचे नाव आहे. संशयित आरोपी मुलगा अजीऊल शेख (19) हा पसार असून, त्याच्या शोधासाठी पथके रवाना झाल्याचे जिन्सी ठाण्याचे निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी सांगितले. मूळ प. बंगालचे मती शेख हे मुलगा शाहीन, अजीऊल शेख (19) यांच्यासह बाबर कॉलनीत भाड्याने राहत होते. ते बेकरीत मजुरी करत. भावाने वडिलांच्या डोक्यात लाकडी दांडा मारल्याचा शाहीनला संशय आहे. जखमी मती शेख यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

COMMENTS