Homeताज्या बातम्याअहमदनगर

देवळाली प्रवरा येथे जनगणना प्रशिक्षण कार्यक्रमअप्पर जिल्हाधिकारी कोळेकर यांचे मार्गदर्शन ; पारदर्शी काम करण्याच्या सूचना

देवळाली प्रवरा : नगरपरिषदेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात प्रगणक व पर्यवेक्षकांसाठी आयोजित जनगणना प्रशिक्षण कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी भेट देत प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.यावेळी बोलताना कोळेकर म्हणाले की, भारतातील माहिती संकलनाची प्रक्रिया आता पूर्णपणे डिजिटल माध्यमातून होणार असून प्रगणक व पर्यवेक्षकांनी योग्य प्रशिक्षण घेऊन जनगणना अचूक व सक्षमपणे पार पाडणे आवश्यक आहे. जनगणना ही सामाजिक व आर्थिक नियोजनाचा महत्त्वाचा आधार असून शासनाच्या विविध योजनांसाठी या माहितीचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो.शून्य ते सहा वयोगटातील बालकांसाठी भविष्यातील सुविधा, तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी राबवायच्या योजनांचे नियोजन जनगणनेच्या आकडेवारीवर आधारित असते. त्यामुळे कोणतेही घर किंवा व्यक्ती जनगणनेतून वगळली जाणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमास मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील, कार्यालयीन अधीक्षक तथा वसुली विभाग प्रमुख रामदास म्हस्के, प्रशिक्षक सचिन निमसे व सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुनील गोसावी उपस्थित होते. प्रशिक्षणामध्ये डिजिटल माध्यमातून माहिती संकलन, घरगुती माहिती नोंदणी, अचूक माहिती भरण्याची प्रक्रिया तसेच प्रत्यक्ष कामातील विविध बाबींविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.प्रशिक्षक सचिन निमसे व सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुनील गोसावी यांनी प्रशिक्षणाचे नियोजन प्रभावीपणे सांभाळले. नगरपरिषदेच्या विविध विकासकामांची व नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधांची माहितीही देण्यात आली.नगरपरिषदेची सद्यस्थिती, प्रशिक्षणाची तयारी व नियोजन पाहून अप्पर जिल्हाधिकारी कोळेकर यांनी समाधान व्यक्त करत प्रशिक्षणार्थींना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

टंचाई विभागातील कर्मचारी कायम गैरहजर? पत्रकारांच्या पाहणीत टेबल रिकामे; हालचाल नोंदीबाबतही प्रश्न उपस्थित
संतोष पेढेकर यांची भारतीय सैन्यात निवड
अकोले तालुक्यात जनगणनेसाठी प्रशासन सज्ज४५८ प्रगणक व ६९ पर्यवेक्षकांना प्रशिक्षण; डिजिटल पद्धतीने जनगणना

COMMENTS