Homeताज्या बातम्याअहमदनगर

अकोले तालुक्यात जनगणनेसाठी प्रशासन सज्ज४५८ प्रगणक व ६९ पर्यवेक्षकांना प्रशिक्षण; डिजिटल पद्धतीने जनगणना

अकोले : देशाच्या भविष्यासाठी विकासाचा पाया ठरणारी जनगणना मोहीम आता वेग घेत असून अकोले तालुक्यातही प्रशासनाने जनगणनेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. या मोहिमेसाठी तालुक्यात एकूण ४५८ प्रगणक व ६९ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना टप्प्याटप्याने प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे प्रगणक व पर्यवेक्षक जनगणना मोहिमेसाठी सज्ज झाले आहेत.यंदाची जनगणना पारंपरिक कागद-पेनऐवजी पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होणार असल्याने माहिती अधिक अचूक, सुरक्षित आणि वेगवान पद्धतीने संकलित होणार आहे. अकोले तालुक्याचे तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही जनगणना मोहीम राबविण्यात येणार आहे.जनगणना मोहिमेबाबत तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे, नायब तहसीलदार किसन लोहरे तसेच महसूल सहाय्यक भाऊराव डगळे यांनी प्रगणक व पर्यवेक्षकांना विविध सूचना देत मोहिमेस सहकार्य करण्याचे आवाहन केले.यावेळी तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली फिल्ड ट्रेनर प्रा. संतोष नवले, प्रा. सचिन लगड, प्रा. शशीकांत लेंभे, प्रा. आदेश बांगर, प्रा. जुबेर बागवान, प्रा. शुभम बोरसे, प्रा. विठ्ठल कवटे व प्रा. श्रीराम देशमुख यांनी प्रगणक व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण दिले. जनगणना २०२७ अंतर्गत ही प्रक्रिया १६ मे ते १४ जून दरम्यान पार पडणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.जनगणना दोन टप्प्यांत होणार असून पहिल्या टप्प्यात इमारत व घरगणना केली जाणार आहे. ही प्रक्रिया जलद व पारदर्शक असून प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने अचूक माहिती नोंदवणे आवश्यक आहे. प्रशिक्षणामुळे प्रगणक व पर्यवेक्षक अधिक सक्षमपणे माहिती संकलित करून जनगणना यशस्वी करतील.  – डॉ. सिद्धार्थ मोरे, तहसीलदार, अकोले

कृत्रिम बुद्धिमत्ता, मानवी संवेदना आणि पारंपरिक ज्ञानाच्या समन्वयातून पशुपालनात भरभराट आणा : पंकजा मुंडेएकात्मिक दुग्धव्यवसाय विकास उपक्रमाचे उद्घाटन; शेतकर्‍यांच्या उत्पन्नवाढीस चालना
घर कोसळून महिलेचा मृत्यू ; पाच जखमी
सरसकट कर्जमाफीसाठी नगर-मनमाड महामार्गावर चक्काजाम  शिंदे शिवसेना शेतकरी सेनेचे राहुरीत आंदोलन

अकोले : देशाच्या भविष्यासाठी विकासाचा पाया ठरणारी जनगणना मोहीम आता वेग घेत असून अकोले तालुक्यातही प्रशासनाने जनगणनेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. या मोहिमेसाठी तालुक्यात एकूण ४५८ प्रगणक व ६९ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना टप्प्याटप्याने प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे प्रगणक व पर्यवेक्षक जनगणना मोहिमेसाठी सज्ज झाले आहेत.यंदाची जनगणना पारंपरिक कागद-पेनऐवजी पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होणार असल्याने माहिती अधिक अचूक, सुरक्षित आणि वेगवान पद्धतीने संकलित होणार आहे. अकोले तालुक्याचे तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही जनगणना मोहीम राबविण्यात येणार आहे.जनगणना मोहिमेबाबत तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे, नायब तहसीलदार किसन लोहरे तसेच महसूल सहाय्यक भाऊराव डगळे यांनी प्रगणक व पर्यवेक्षकांना विविध सूचना देत मोहिमेस सहकार्य करण्याचे आवाहन केले.यावेळी तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली फिल्ड ट्रेनर प्रा. संतोष नवले, प्रा. सचिन लगड, प्रा. शशीकांत लेंभे, प्रा. आदेश बांगर, प्रा. जुबेर बागवान, प्रा. शुभम बोरसे, प्रा. विठ्ठल कवटे व प्रा. श्रीराम देशमुख यांनी प्रगणक व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण दिले. जनगणना २०२७ अंतर्गत ही प्रक्रिया १६ मे ते १४ जून दरम्यान पार पडणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.जनगणना दोन टप्प्यांत होणार असून पहिल्या टप्प्यात इमारत व घरगणना केली जाणार आहे. ही प्रक्रिया जलद व पारदर्शक असून प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने अचूक माहिती नोंदवणे आवश्यक आहे. प्रशिक्षणामुळे प्रगणक व पर्यवेक्षक अधिक सक्षमपणे माहिती संकलित करून जनगणना यशस्वी करतील.

 – डॉ. सिद्धार्थ मोरे, तहसीलदार, अकोले

COMMENTS