Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बारामतीच्या कृषी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

कर्जत/प्रतिनिधी ः ग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामतीचे कृषी विज्ञान केंद्र, अटल इनक्युबेशन सेंटर, मायक्रोसॉफ्ट व लंडन ऑक्सफर्ड विद्यापीठ यांच

आमदार निलेश लंकेच्या आंदोलनास पाथर्डीत संमिश्र प्रतिसाद
के.जे.सोमैया महाविद्यालयात ’डोळ्यांची काळजी’ विषयावर व्याख्यान  
पदोन्नती आरक्षण रद्दच्या त्या आदेशाला खंडपीठात आव्हान ; पारनेरच्या आंबेडकरांची जनहित याचिका

कर्जत/प्रतिनिधी ः ग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामतीचे कृषी विज्ञान केंद्र, अटल इनक्युबेशन सेंटर, मायक्रोसॉफ्ट व लंडन ऑक्सफर्ड विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने कृषिक 2023 या कृषी प्रदर्शनाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. 170 एकरावरील कृषिकमध्ये कृषी संशोधन प्रकल्पातील अनेक प्रात्यक्षिके शेतकरी, उद्योजक यांना दाखवण्यात येत आहेत.

शेतकर्‍यांना व्हर्टिकल फार्मिंग, रोबोटचा कृषी क्षेत्रात वापर, मशागतीची अवजारे, दुग्ध आणि फळप्रक्रिया क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान, दूध आणि भाजीपाला प्रक्रिया उद्योग, बि- बियाणे, खते, किड व रोग नियंत्रण, आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे तयार केलेल्या मशनरींपासून ते मीनी रोबो ट्रॅक्टर असे कित्येक उपक्रम पाहण्याची संधी येथे उपलब्ध आहे. प्रदर्शनामध्ये प्रत्येक प्लॉटवर त्या पिकांची माहिती देणारी व्यक्ती तसेच माहितीचे फलक उपलब्ध आहेत. विविध भागातील हजारो शेतकरी शेतीमधील ज्ञान व तंत्रज्ञानाची माहिती घेत आहेत. रोहित पवार हे कर्जत- जामखेड मतदारसंघाचे आमदार झाल्यानंतर ग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी या भागातील गावागावात जावून कृषीविषयक मार्गदर्शन केले. या भागातूनही मोठ्या प्रमाणावर शेतकरी हे प्रदर्शन पाहण्यासाठी येत आहेत. चेअरमन राजेंद्र पवार, विश्‍वस्त सुनंदाताई पवार, सीईओ नीलेश नलावडे व इतरांकडून स्वागत केले जात आहे. या कृषी प्रदर्शनातून शेतकरी हे कृषी क्षेत्रातील एक नवी दृष्टी घेवून जात आहेत.

COMMENTS