Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात सोमवारी सुटी जाहीर

मुख्यमंत्री शिंदे सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई ः अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त केंद्र सरकारने अर्ध्या दिवसाची सुटी जाहीर केल्यानंतर शुक्रवारी महाराष्ट्र सरकारने

खडकावर आदळून बोटीला लागली आग रेवस बंदरात थरारक रेस्क्यू ऑपरेशन
कोकमठाण मध्ये समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणाचे थेट प्रेक्षपण
दिव्यांग व ज्येष्ठांना केंद्राने दिला आधार : मंत्री डॉ. विरेंद्रकुमार यांचे प्रतिपादन

मुंबई ः अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त केंद्र सरकारने अर्ध्या दिवसाची सुटी जाहीर केल्यानंतर शुक्रवारी महाराष्ट्र सरकारने देखील सुटी जाहीर केली आहे. त्यामुळे सोमवारी 22 जानेवारी रोजी राज्यातील सर्व सरकारी आस्थापना बंद राहणार आहेत. महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकारनेही केंद्राच्या पावलावर पाऊल टाकत 22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. श्री राम प्राण प्रतिष्ठा सोहळा धुमधडाक्यात साजरा होत आहे. 22 जानेवारीचा सोहळा बघण्यासाठी लोक उत्सुक आहेत. हा ऐतिहासिक क्षण आहे. सर्वांना तो बघता यावा, यासाठी महाराष्ट सरकारने सर्वाजनिक सुट्टी जाहीर करावी, यासाठी लोकप्रतिनिधी व विविध धार्मिक, सामाजिक आदी संस्थांनी राज्यपाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन दिले होते. सोहळ्याच्या दिवशी लोक रस्त्यावर उतरून जल्लोष करणार आहेत. त्यामुळे बाधा निर्माण होऊ नये. शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी, शासकीय निमशासकीय कर्मचार्‍यांनाही याचा आनंद घेता यावा, यासाठी सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्याची दखल घेण्यात आली असून राज्यपाल यांच्या आदेशान्वये 22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

दहावीचा पेपर एक दिवसाने पुढे – दहावीच्या हजारो विद्यार्थ्यांच्या सराव परीक्षा सुरु आहेत. सोमवारीही पेपर होता. पण श्री रामलल्ला प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आल्याने हा पेपरही एक दिवसाने पुढे ढकलण्यात आला आ

COMMENTS