Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजप कॅबिनेट मंत्र्याच्या पीएचा पत्नीचा गळा आवळून खुनाचा प्रयत्न; वाचवायला आलेल्या पोटच्या मुलालाही बॅटने मारहाण!

पुणे : राज्याच्या एका भाजप कॅबिनेट मंत्र्याच्या खासगी स्वीय सहाय्यकाचा (PA) भयानक चेहरा समोर आला आहे. पुण्यात राहणाऱ्या या पीएने केवळ मोबाईल चॅटि

कर्जतला रिंग रोड कधी होणार? वारंवार वाहतूक कोंडी; दूरदृष्टीचा अभाव; बायपास रखडल्याने विकासावर परिणाम 
लाठ्याकाठ्यांनी मारहाण; उपचारादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू; पिंपळगाव उंडा येथील घटना; मुख्य आरोपी अटकेत
आरक्षण उपवर्गीकरण समितीचा अहवाल सार्वत्रिक करा : माकप

पुणे : राज्याच्या एका भाजप कॅबिनेट मंत्र्याच्या खासगी स्वीय सहाय्यकाचा (PA) भयानक चेहरा समोर आला आहे. पुण्यात राहणाऱ्या या पीएने केवळ मोबाईल चॅटिंगवरून झालेल्या वादातून आपल्या पत्नीचा गळा आवळून तिला संपवण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक म्हणजे, आईला वाचवण्यासाठी आलेल्या चिमुरड्या मुलालाही या बापाने दया दाखवली नाही.
विजय कारंडे असे या संशयित आरोपीचे नाव असून, तो एका भाजप कॅबिनेट मंत्र्याकडे खासगी स्वीय सहाय्यक तसेच ओएसडी (OSD) म्हणून कार्यरत आहे. ही घटना ३० एप्रिल रोजी पुणे स्टेशन परिसरातील क्वीन्स गार्डन येथील त्यांच्या घरी घडली. कारंडे घरी मोबाईलवर कोणासोबत तरी चॅटिंग करत होते, ज्यावरून पत्नीने सहज विचारणा केली होती.
केवळ पत्नीने विचारणा केली म्हणून विजय कारंडे यांचा राग अनावर झाला. त्यांनी पत्नीला अश्लील शिवीगाळ करत तिचा गळा आवळला. यावेळी आईला वाचवण्यासाठी छोटा मुलगा मध्ये आला, तेव्हा संतापलेल्या कारंडेने क्रिकेटच्या बॅटने मुलाला बेदम मारहाण केली. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी असून त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर पीडित पत्नीने आधी अहिल्यानगरमध्ये धाव घेत तक्रार नोंदवली होती. मात्र, घटनेचे ठिकाण पुणे असल्याने हा गुन्हा आता पुण्याच्या कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. पुण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
एका जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीने आपल्याच कुटुंबावर अशा प्रकारे जीवघेणा हल्ला केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणात संबंधित मंत्री काय भूमिका घेणार आणि पोलीस आरोपीवर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS