Homeताज्या बातम्या

महिलांनी शेतीपूरक उद्योगातून स्वावलंबी व्हावे : शास्त्रज्ञ शैलेश देशमुख

लोणी: शेती आणि शेतीपूरक व्यवसायाच्या माध्यमातून महिलांसाठी उद्योग उभारणीच्या मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूक्ष

निर्भीड पत्रकार संघ शिरूर कासारची नूतन तालुका कार्यकारिणी जाहीर; प्रमोद निकम तालुकाध्यक्ष तर रामेश्वर क्षीरसागर उपाध्यक्ष
मराठवाड्यात भाजप शून्यावर; राज्यसभेच्या आधारावर किती दिवस राजकारण?
जि.प. व पं.स. निवडणुकांसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे – अशोक बुटले; अर्धापुरात जंगी स्वागत

लोणी: शेती आणि शेतीपूरक व्यवसायाच्या माध्यमातून महिलांसाठी उद्योग उभारणीच्या मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेतून उद्योग उभारणीसाठी अर्थसहाय्य उपलब्ध होत असून, महिलांनी या संधीचा लाभ घेऊन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे, असे आवाहन महाबळेश्वर कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ शैलेश देशमुख यांनी केले.

बाभळेश्वर येथील कृषी विज्ञान केंद्रात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत आयोजित बीज भांडवल प्रशिक्षण कार्यक्रमात देशमुख बोलत होते बोलत होते.

संस्थेचे अध्यक्ष तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुप्रिया ढोकणे-पाटील आदींसह प्रशिक्षणार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

देशमुख म्हणाले, अहिल्यानगर जिल्ह्यात महिला बचत गटांच्या माध्यमातून अनेक महिला विविध शेतीपूरक व्यवसायांकडे वळत आहेत. अन्नप्रक्रिया, कृषीमाल प्रक्रिया आणि मूल्यवर्धनाच्या माध्यमातून महिलांना स्वतःचा उद्योग उभारण्याची संधी आहे. जिल्ह्यात महिलांनी सुरू केलेल्या उद्योगांना विविध संस्थांच्या माध्यमातून पाठबळ मिळत आहे. या उद्योगांना आणखी गती देण्यासाठी केंद्र शासनाच्या योजनांची माहिती महिलांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.

“प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करून महिलांनी स्वतःचा प्रकल्प अहवाल तयार करावा आणि बँकेकडे सादर करून उपलब्ध अर्थसहाय्याचा लाभ घ्यावा,” असे आवाहन देशमुख यांनी केले. बँकाही महिला बचत गट आणि शेतकरी महिलांना उद्योग उभारणीसाठी बीज भांडवल व अर्थसहाय्य देण्यासाठी पुढे येत असल्याने महिलांसमोर उद्योगाची नवी दारे खुली झाली आहेत, असे त्यांनी सांगितले.

COMMENTS