Homeताज्या बातम्यादेश

बसपाच्या प्रमुख मायावतींचा स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी आपला 70 वा वाढदिवस साजरा करताना आगामी राजकीय वाटचालीबाबत महत्त्वपूर्ण

नवीन यूजीसी नियमांना बसपचा पाठिंबा
सर्वसामान्यांवर कोरोनानंतर ‘महागाई’चे सुल्तानी संकट कोसळलंय!
महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने पुरोगामी बनवण्यासाठी ‘बसपा’च पर्याय

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी आपला 70 वा वाढदिवस साजरा करताना आगामी राजकीय वाटचालीबाबत महत्त्वपूर्ण भूमिका मांडली. लखनऊ येथील बसपा मुख्यालयात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पक्ष भविष्यात सर्व निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचा स्पष्ट निर्धार व्यक्त केला.
या प्रसंगी मायावती यांच्या हस्ते बसपाच्या विचारधारेचा आरसा मानल्या जाणार्‍या ‘ब्लू बुक’च्या 21व्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. आगामी विधानसभा निवडणुकीत कोणतीही कसर सोडली जाणार नसल्याचे सांगत त्यांनी सध्याच्या राजकीय वातावरणावर भाष्य केले. सर्वच समाजघटक सध्याच्या व्यवस्थेवर नाराज असून, त्यांना पुन्हा एकदा बसपाचे सरकार हवे असल्याचा दावा त्यांनी केला. निवडणूक प्रक्रियेबाबत चिंता व्यक्त करताना मायावती म्हणाल्या की, ईव्हीएमच्या विश्‍वासार्हतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत असून मतदार यादी दुरुस्ती (एसआयआर) प्रक्रियेबाबतही अनेक तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी सतर्क राहण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. युतीच्या राजकारणावर टीका करताना मायावती यांनी स्पष्ट केले की, आघाड्या आणि युतींमुळे बसपाचे नुकसान झाले आहे. विशेषतः उच्च जातींची मते प्रामुख्याने जातीयवादी पक्षांकडे वळतात, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. त्यामुळेच अनेक पक्षांना बसपासोबत युती करायची इच्छा असते, असा टोलाही त्यांनी लगावला. मात्र, भविष्यात उच्च जातींचा ठोस पाठिंबा मिळेल याची खात्री झाल्याशिवाय युतीचा विचार केला जाणार नाही, आणि त्यासाठी वेळ लागेल, असेही त्यांनी सांगितले.

COMMENTS