…अन्यथा, महाराष्ट्र सुरक्षित नाही, अशी धारणा होईल!

Homeताज्या बातम्यासंपादकीय

…अन्यथा, महाराष्ट्र सुरक्षित नाही, अशी धारणा होईल!

 महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांना प्रमाण मानले जाते असे ज्येष्ठ मुत्सद्दी नेते आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे रचनाकार शरद पवार यांच्या मु

नोरा फतेहीला पाहून ही मुलगी ढसाढसा रडू लागली
अपमान जनक वागणुकीमुळे बौद्ध भिक्षुकांचा एल्गार
रंगपंचमी उत्सवात नियमांचे पालन करा अन्यथा कायदेशीर कार्यवाही

 महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांना प्रमाण मानले जाते असे ज्येष्ठ मुत्सद्दी नेते आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे रचनाकार शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानासमोर झालेला हिंसक हल्ला अतिशय निंदनीय आणि निषेधार्ह आहे. देशाच्या एवढ्या ज्येष्ठ नेत्याच्या आंतरराष्ट्रीय महानगरातील अतिशय व्हिआयपी विभागात अचानक झालेला हल्ला एक षडयंत्राचा भाग असल्याशिवाय होवूच शकत नाही, ही देशातील आणि राज्याच्या तमाम नागरिकांची धारणा आहे! महाराष्ट्राच्या गृहमंत्री वळसे-पाटील यांच्यासोबत कालच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली होती. मुख्यमंत्र्यांना दररोज सकाळी नियमितपणे पोलिस यंत्रणेकडून रिपोर्टींग केली जाते. कालही ती रिपोर्टींग झालीच असेल. पण प्रश्न असा उद्भवतो की, त्यात अशा संभाव्य हल्याविषयी काही सूचना होत्या का? जर या हल्ल्याविषयी काही अंदाज होता असे म्हटले तर त्याविरोधात वेळेवरच पाऊल कसे उचलले गेले नाही? जर तशा संभाव्य धोक्याची सूचना नसेल तर मग राज्याच्या गुप्तचर यंत्रणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याशिवाय राहत नाही, हे देखील तेवढेच सत्य. एसटी कर्मचारी -कामगारांचा संप हा दीर्घकाळ चालला, ज्यात राज्याच्या जनतेला अतोनात हाल सोसावे लागले. लोकांचा विश्वास गमावण्याइतपत टोकाला नेलेले आंदोलन कधीही समर्थनीय नसते, याची जाण ना या कामगार-कर्मचाऱ्यांना राहीली, ना त्यांच्या नेत्याला आणि ना त्यांच्यामागील सूत्रधारांना. मुळात या आंदोलनाला सुरुवात भाजपच्या पडळकर -खोत या दोन नेत्यांनी केली होती. परंतु, संपाच्या नोटीसीचा कायदेशीर मुद्दा जेंव्हा उभा राहिला तेव्हा भाजपच्या नेत्यांनी आंदोलनातून पळ काढला, तर, एसटी कर्मचारी -कामगार युनियनच्या तथाकथित नेत्यानेही आंदोलन मागे घेतल्याची बळेबळेच घोषणा केली; अन् त्यानंतर एक तथाकथित कामगार नेता म्हणवणाऱ्या वकीलाचा या आंदोलनात प्रवेश झाला. नागपूरी नेत्यांच्या अधीन राहिलेल्या या आंदोलनात त्या वकिलाच्या असंबद्ध क्लिप्स सोशल मिडिया पासून तर प्रसारमाध्यमांपर्यंत प्रसिध्दिला येत राहिल्या. मात्र, कोणताही प्रश्न सुटण्याऐवजी त्याची क्लिष्टता वाढत राहिली. सकृतदर्शनी वकील म्हणून तथाकथित कामगार नेता दरवेळी काहीतरी बडबड करून जात असे. शेवटी, त्या वकिलाच्या तोंडातून सत्य बाहेर पडले की, ‘ आपण घाबरण्याचे कारण नाही, कारण आपल्यामागे आर‌एस‌एस आहे.’ हे विधान या संपूर्ण आंदोलनामागचे वास्तव सांगून जाते. काल अमोल मिटकरी या राष्ट्रवादीच्या आमदाराने देखील शरद पवार यांच्या निवासस्थाना समोर झालेल्या हल्ल्याचे मास्टरमाईंड नागपूरात आरामात असल्याचे विधान केले आहे. शरद पवार यांच्या इतका दीर्घ अनुभवी राजकीय नेता राज्यातच नव्हे तर आज देशात सापडणे कठीण आहे. अशा राज्याच्या लोकप्रिय नेत्याच्या निवासस्थानी झालेला हल्ला कोणत्याही कारणास्तव दुर्लक्षिला जावू नये. या हल्ल्याच्या तपासात हयगय किंवा दुर्लक्ष झाले तर अशा प्रकारच्या षडयंत्रांच्या सातत्यात वाढ होईल. एसटी कर्मचारी -कामगार यांनी जनतेची सहानुभूती आधीच गमावली आहे. त्यात ते १०७ लोकं खरंच एसटी कर्मचारी -कामगार होते की नेमकं काय या दिशेनेही तपास व्हायला हवा. हे कामगार-कर्मचारी सुरूवातीपासूनच भाजप सोबत राहिलेले दिसतात. त्यामुळे त्यांचा फुले-शाहू-आंबेडकरी विचारांशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे, त्यांनी हिंसक आंदोलन करताना काही घोषणांचा निनाद केला असेल तर आणखीच त्यांची चौकशी कडक करायला हवी. कारण, फुले – शाहू – आंबेडकरी विचार त्यांचा नाहींच. शिवाय त्यांच्या वकिल तथा तथाकथित कामगार नेत्याला आंबेडकरी एससी, एसटी, ओबीसी, व्हीजेएनटी, बौध्द यांची कुणाचीही मान्यता नव्हती. त्यामुळे, शरद पवार यांच्या निवासस्थानासमोर झालेला हल्ला व्यापक षडयंत्राचा भाग आहे, त्याची कसून चौकशी व्हावी, अन्यथा, महाराष्ट्र सुरक्षित नाही, अशी जनतेची धारणा होईल!

COMMENTS