Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एसआयआर मॅपिंगसाठी मतदारांची पिळवणूक; मुदत वाढ द्यासमाजवादी पक्षाचे माजलगाव तालुकाध्यक्ष नवीदोद्दीन सिद्दिकी यांची मागणी

माजलगाव : सध्या केंद्र शासन, राज्य शासन व निवडणूक आयोगामार्फत एसआयआर मॅपिंग प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र ही प्रक्रिया अत्यंत कमी कालावधीत

बीडमध्ये पोलिस कर्मचार्‍याची आत्महत्या
जिजामाता नर्सिंग कॉलेजमध्ये ‘लॅम्प लायटिंग’ व स्नेहसंमेलन थाटात संपन्न
फायदा आणि तोटा पाहणारे आम्ही नाहीततेलगाव येथे आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला कडाडून विरोध

माजलगाव : सध्या केंद्र शासन, राज्य शासन व निवडणूक आयोगामार्फत एसआयआर मॅपिंग प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र ही प्रक्रिया अत्यंत कमी कालावधीत आणि घाईगडबडीत पार पडत असल्यामुळे अनेक सर्वसामान्य नागरिक एसआयआर मॅपिंगपासून वंचित राहत आहेत. ही बाब लक्षात घेता एसआयआर प्रक्रियेला मुदत वाढ देण्यात यावी अशी मागणी समाजवादी पक्षाचे माजलगाव तालुका अध्यक्ष नवीदोद्दीन सिद्दिकी यांनी केली आहे.
याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, काही ठिकाणी एसआयआर मॅपिंगच्या प्रक्रियेदरम्यान नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असून, काही प्रमाणात पिळवणुकीच्या तक्रारी देखील पुढे येत आहेत. तसेच एसआयआर मॅपिंगसाठी नियुक्त करण्यात आलेले बीएलओ हे बहुतांश शिक्षक असून सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्यामुळे या प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत. याचबरोबर अनेक गोरगरीब व सर्वसामान्य नागरिक रोजगाराच्या निमित्ताने देश-विदेशात स्थलांतरित झालेले आहेत. आर्थिक अडचणींमुळे त्यांना गावात येऊन एसआयआर मॅपिंग पूर्ण करणे शक्य होत नाही, परिणामी ते या प्रक्रियेतून वंचित राहत आहेत. वरील सर्व बाबींचा विचार करता, बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध भागांतून एसआयआर मॅपिंगसाठी दिलेल्या वेळेला मुदत वाढ देण्यात यावी अशी मागणी समाजवादी पक्षाचे माजलगाव तालुकाध्यक्ष नवीदोद्दीन सिद्धीकी यांनी केली आहे.

COMMENTS