बीड: भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमाच्या वेळापत्रकात सुधारणा करून मुदत वाढविली आहे. सुधारित वेळापत्रकान

बीड: भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमाच्या वेळापत्रकात सुधारणा करून मुदत वाढविली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार बीएलओ मार्फत घरभेटी 17 ऑगस्ट 2026 पर्यंत सुरू राहतील. त्यानंतर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे, दावे व हरकती स्वीकारणे आणि अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. याबाबत ब्राईट सोशल फाउंडेशन, बीड यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, ज्यांनी अद्याप SIR अंतर्गत आवश्यक माहिती किंवा कागदपत्रे सादर केलेली नाहीत त्यांनी ही मुदतवाढ अंतिम संधी म्हणून स्वीकारावी. प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत राहणे हे लोकशाही बळकट करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. संस्थेने नागरिकांना आपल्या संबंधित बीएलओ, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. ब्राईट सोशल फाउंडेशन, बीड यांच्या वतीने सर्व नागरिकांना विनंती करण्यात आली आहे की, कोणताही पात्र मतदार या प्रक्रियेपासून वंचित राहू नये यासाठी प्रत्येकाने स्वतःबरोबरच आपल्या कुटुंबीय, शेजारी व परिचितांनाही SIR प्रक्रिया पूर्ण करण्यास सहकार्य करावे.

COMMENTS