Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गेवराईत दहा दिवसीय डान्स व ॲक्टिंग शिबिराचे भव्य आयोजन

गेवराई : बालरंगभूमी परिषद शाखा बीड, नाट्यशास्त्र विभाग, सौ. के. एस. के. महाविद्यालय बीड आणि आर्ट ऑफ फन अकॅडमी गेवराई यांच्या संयुक्त विद्यमाने गे

समर कॅम्पमुळे मुलं तणावमुक्त होतात : अध्यक्ष अनंत ढोले ढोले
उन्हाळी गर्दी कमी करण्यासाठी नांदेड-आसनसोल दरम्यान विशेष गाडी
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरसकट उन्हाळी सुट्टी द्या; अंगणवाडी सेविका मदतनीस एकजूट सेवा संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Mobile Library in Beed; Book boxes will circulate in schools, a new  initiative to inculcate the culture of reading

गेवराई : बालरंगभूमी परिषद शाखा बीड, नाट्यशास्त्र विभाग, सौ. के. एस. के. महाविद्यालय बीड आणि आर्ट ऑफ फन अकॅडमी गेवराई यांच्या संयुक्त विद्यमाने गेवराई येथे दहा दिवसीय डान्स व ॲक्टिंग शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
सध्या सर्वत्र शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या असून अनेक मुले मैदानी खेळांपेक्षा मोबाईलच्या स्क्रीनमध्ये गुंतलेली दिसून येतात. त्यामुळे मुलांचा स्क्रीन टाइम कमी करून त्यांना कला, संस्कार व सर्जनशीलतेची ओळख करून देण्यासाठी तसेच त्यांच्या मानसिक व बौद्धिक विकासासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिरामध्ये सिने क्षेत्रातील नामवंत कलाकारांचे मार्गदर्शन लाभणार आहे. यामध्ये सोनी मराठीवरील जय जय शनिदेव या मालिकेतील प्रमुख अभिनेता व दिग्दर्शक संकेत खेडकर, झी मराठी व कलर्स मराठी फेम सिने कलावंत व दिग्दर्शक देवीप्रसाद सोहोनी, सुप्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक लक्ष्मीकांत दोडके, नृत्यविशारद राधाकृष्ण वाघ तसेच लेखक व दिग्दर्शक डॉ. अस्लम शेख यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. हे शिबिर दिनांक 27 एप्रिल ते 6 मे 2026 या कालावधीत महात्मा फुले शॉपिंग सेंटर (तापडिया सिटी सेंटर), बाजारतळ, गेवराई येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात सहभागी होणार्‍या बालकलाकारांना आर्ट ऑफ फन अकॅडमी व बालरंगभूमी परिषदेच्या विविध प्रोजेक्टमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. त्यामुळे गेवराई व परिसरातील जास्तीत जास्त मुलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन बालरंगभूमी परिषद उपाध्यक्ष डॉ. दिपाताई क्षीरसागर, नाट्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजय पाटील देवळाणकर, शाहीर विलास बापू सोनवणे, दीपक गिरी, शिवकुमार सोनवणे, रोहित पुराणिक व विवेक शर्मा यांनी केले आहे.व प्रवेशासाठी रोहित पुराणिक 9325212199 शिवकुमार सोनवणे 9689263220, दीपक गिरी 8177924756, विवेक शर्मा ,9836768620 यांना संपर्क करावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

COMMENTS