माका : गावाचे ग्रामदैवत असलेल्या मंकावती देवीच्या पावनभूमीत आयोजित दुसऱ्या नारळी सप्ताहाची सांगता शुक्रवार (दि. १ मे) रोजी मोठ्या भक्तीमय वातावरणात करण्यात आली. बिड जिल्ह्यातील शृंगार ऋषीगडाचे महंत सुरेशानंदजी महाराज शास्त्री यांच्या अधिपत्याखाली हा सप्ताह पार पडला. सप्ताहाचा समारोप काल्याच्या कीर्तनरूपी सेवेद्वारे करण्यात आला. या वेळी पंचक्रोशीतील असंख्य भाविक, संत-महात्मे तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या कीर्तनातून महंत सुरेशानंदजी महाराज यांनी भाविकांना मार्गदर्शन करताना परमार्थ मार्गाचे महत्त्व अधोरेखित केले. “माणसाने आयुष्यात साधू-संतांची सेवा करत परमार्थाचा मार्ग स्वीकारला, तर कोणतीही कमतरता भासत नाही,” असे त्यांनी सांगितले. संपूर्ण सप्ताहादरम्यान सकाळ-सायंकाळ राज्यातील नामांकित कीर्तनकारांच्या कीर्तनसेवा, तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांसाठी अहोरात्र भोजन व्यवस्थाही करण्यात आली होती. या सर्व कार्यक्रमांना पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. या प्रसंगी विविध जिल्ह्यांतील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. खा.रामराव वडकुते,आ.सुरेश धस,आ.विठ्ठलराव लंघे, महापौर ज्योती गाडे, अमोल गाडे, अभय आव्हाड, भैय्या धस, नवनाथ पडळकर, भारत शिंगाडे, कोळेकर, डाॅ.स्नेहलता सोनटक्के, चितळकर, नरोटे, रामहरी महारनोर तसेच इतर प्रतिष्ठित मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माका ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील नागरिकांनी विशेष सहकार्य केल्याबद्दल आयोजकांनी आभार व्यक्त केले.

माका : गावाचे ग्रामदैवत असलेल्या मंकावती देवीच्या पावनभूमीत आयोजित दुसऱ्या नारळी सप्ताहाची सांगता शुक्रवार (दि. १ मे) रोजी मोठ्या भक्तीमय वातावरणात करण्यात आली. बिड जिल्ह्यातील शृंगार ऋषीगडाचे महंत सुरेशानंदजी महाराज शास्त्री यांच्या अधिपत्याखाली हा सप्ताह पार पडला.
सप्ताहाचा समारोप काल्याच्या कीर्तनरूपी सेवेद्वारे करण्यात आला. या वेळी पंचक्रोशीतील असंख्य भाविक, संत-महात्मे तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या कीर्तनातून महंत सुरेशानंदजी महाराज यांनी भाविकांना मार्गदर्शन करताना परमार्थ मार्गाचे महत्त्व अधोरेखित केले. “माणसाने आयुष्यात साधू-संतांची सेवा करत परमार्थाचा मार्ग स्वीकारला, तर कोणतीही कमतरता भासत नाही,” असे त्यांनी सांगितले.
संपूर्ण सप्ताहादरम्यान सकाळ-सायंकाळ राज्यातील नामांकित कीर्तनकारांच्या कीर्तनसेवा, तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांसाठी अहोरात्र भोजन व्यवस्थाही करण्यात आली होती. या सर्व कार्यक्रमांना पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.
या प्रसंगी विविध जिल्ह्यांतील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. खा.रामराव वडकुते,आ.सुरेश धस,आ.विठ्ठलराव लंघे, महापौर ज्योती गाडे, अमोल गाडे, अभय आव्हाड, भैय्या धस, नवनाथ पडळकर, भारत शिंगाडे, कोळेकर, डाॅ.स्नेहलता सोनटक्के, चितळकर, नरोटे, रामहरी महारनोर तसेच इतर प्रतिष्ठित मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माका ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील नागरिकांनी विशेष सहकार्य केल्याबद्दल आयोजकांनी आभार व्यक्त केले.

COMMENTS