Homeताज्या बातम्यासंपादकीय

काँगे्रसला गळती !

देशामध्ये गेल्या दोन दिवसांत दोन महत्वाच्या घटनांकडे लक्ष देण्याची गरज आहे. कालच भाजपचा स्थापना दिवस जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी पंतप्रधान

वाचाळवीरांना लगाम हवा
वंचित ‘मविआ’ला बळ देणार का ?
वादळापूर्वीची शांतता

देशामध्ये गेल्या दोन दिवसांत दोन महत्वाच्या घटनांकडे लक्ष देण्याची गरज आहे. कालच भाजपचा स्थापना दिवस जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी कोणत्याही निवडणुका हलक्यात घेवू नका, असा संदेश कार्यकर्त्यांना दिला. तर दुसरी घटना म्हणजे आंध्रप्रदेशातील काँगे्रसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या दोन गोष्टीकडे लक्ष वेधण्याचे कारण म्हणजे, भाजपला एव्हाना जाणीव झाली आहे की, यानंतर होणार्‍या निवडणुका या एकहाती जिंकता येणार नाही. त्या जिंकण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपसमोर प्रभावी असा विरोधी पक्ष नव्हता. मात्र काँगे्रसने भारत जोडो यात्रा आणि अदानी प्रकरणावरून भाजपला चांगलेच घेरले आहे. त्यामुळे देशात विरोधी पक्ष असल्याची जाणीव होत आहे. अन्यथा यापूर्वीच्या निवडणुकीत विरोधी पक्षाचे अस्तित्व दिसतच नव्हते. शिवाय प्रादेशिक पक्षांची मोट बांधत काँगे्रस भाजपसमोर तगडे आव्हान उभे करू पाहत आहे. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणूक भाजप हलक्यात घेणार नाही, हे नक्की. काँगे्रसने कितीही कडवा प्रतिकार केला तरी, भाजप राहुल गांधींना पप्पू, त्यांचा पूर्वीचा भ्रष्टाचार, घराणेशाही असे मुद्दे काढून, काँगे्रसला नामोहरम करत असे. मात्र अदानी प्रकरणावरून भाजप बॅकफूटवर जातांना दिसून येत आहे. शिवाय काँगे्रसची धरसोड वृत्ती नेहमीच दिसून आली आहे. मात्र अदानी प्रकरणी जेपीसी नेमण्यावर काँगे्रस ठाम राहिल्याचे शेवटपर्यंत दिसून आले. त्यामुळे भविष्यातील हा विरोध आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे काँगे्रसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यामुळे काँगे्रसला पुन्हा एकदा विरोधकांची मोट बांधण्याची संधी भाजपने निर्माण करून दिली. राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्यामुळे सर्वच विरोधक एकवटतांना दिसून येत आहे. शिवाय महाविकास आघाडीमध्ये सावरकर मुद्दयावरून बिघाडी होण्याची शक्यता होती. मात्र हा मुद्दा बाजूला गेल्यामुळे बिघाडी काही होण्याची शक्यता नाही. अशा परिस्थितीत भाजपसमोर 2024 मध्ये तगडे आव्हान निर्माण राहील, यात शंका नाही. मात्र असे असतांना, काँगे्रसला लागलेली गळती काही थांबण्याची चिन्हे नाहीत. काँगे्रसचे पूर्वीचे नेते गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल, सारखे अनेक नेते पक्षाबाहेर पडले आहे. त्यानंतर आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी यांनी तर थेट भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे काँगे्रसमध्ये देखील सर्व काही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. कर्नाटक राज्यात निवडणूक होत आहे. अशावेळी काँगे्रसचे दोन धुरंधर नेते सिद्धरामय्या आणि काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार यांच्यात सर्व काही आलबेल असल्याचे दिसून येत नाही. काँगे्रसची कर्नाटकात सत्ता येवू शकते, तसा मतदानोत्तर चाचणींचा कल आहे. मात्र दोन्ही नेते मुख्यमंत्री पदावर आस लावून बसल्यामुळे त्याचा मोठा फटका काँगे्रसला बसू शकतो. त्यामुळे काँगे्रसला यातून मार्ग काढण्याची गरज आहे. 2024 मध्ये काँगे्रसची सीट वाढतील यात शंका नाही, मात्र ते वातावरण काँगे्रसला टिकवता आले पाहिजे. कर्नाटकात काँगे्रसला अनुकूल वातावरण असले तरी, ते वातावरण किती काळापर्यंत अनुकूल राहील, ते अनुकूल ठेवण्यात काँगे्रस यशस्वी होतो का, यावर पुढील गणिते ठरणार आहे. त्यामुळे काँगेसला लागलेली गळती, काँगे्रसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे कशी रोखतात, आणि कर्नाटकातील संघर्ष कसे हाताळतात, यावर बरेच काही अवलंबून असणार आहे. 

COMMENTS