Homeताज्या बातम्या

फरार आरोपी २२ वर्षांनंतर जेरबंद; श्रीगोंदा पोलिसांची कारवाई, नाव बदलून पोलिसांना देत होता चकवा

श्रीगोंदा: तब्बल २२ वर्षांपूर्वी दाखल झालेल्या दरोडा व मारहाणीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला श्रीगोंदा पोलिसांनी शिताफीने सापळा रचून अटक केली. विश

कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबीर; शिंगणापूर येथील श्रद्धा हॉस्पिटलमध्ये १०० हून अधिक रुग्णांची तपासणी
झाडे लावा-झाडे जगवा; पण वाढलेली झाडे वाचविणार कोण?राजुरीवेस ते माळीवेस मार्गावरील झाडांची मोठ्या प्रमाणात छाटणी; नागरिकांमध्ये नाराजी
आसाममध्ये ३.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के; कचार जिल्ह्यात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

श्रीगोंदा: तब्बल २२ वर्षांपूर्वी दाखल झालेल्या दरोडा व मारहाणीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला श्रीगोंदा पोलिसांनी शिताफीने सापळा रचून अटक केली. विशेष म्हणजे, आरोपीने नाव बदलून अनेक वर्षे पोलिसांना चकवा दिला होता. मात्र गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याचा शोध घेऊन अखेर त्याला जेरबंद केले.

अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी राबविलेल्या विशेष फरार आरोपी शोध मोहिमेअंतर्गत श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील फरार आरोपी महेश दरड्या पवार (वय ४५, रा. निमगाव खलू, ता. श्रीगोंदा) याचा शोध सुरू होता.

पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गुप्त बातमीदारामार्फत आरोपी श्रीगोंदा परिसरात नाव बदलून राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार २६ जून रोजी माहितीची शहानिशा करण्याचे आदेश देण्यात आले. माहितीची खात्री झाल्यानंतर २७ जून रोजी पोलीस पथकाने वेशांतर करून सापळा रचला आणि आरोपीला ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान आरोपीने आपले मूळ नाव महेश दरड्या पवार असल्याची कबुली दिली. त्याने सांगितले की, तो महेश श्याम पवार या नावाने राहत होता. याच खोट्या ओळखीचा आधार घेऊन त्याने अनेक वर्षे आपली खरी ओळख लपवून पोलिसांची दिशाभूल केली. चौकशीनंतर तोच २००४ मधील गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याची खात्री झाल्याने त्याला अटक करण्यात आली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबुर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुजीतकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोहर खिळदकर, पोलीस कर्मचारी आनंद मैड, वैजिनाथ कुटे, राहुल मोढळे, अरुण पवार, पळसे, पांडुरंग भांडवलकर, नितीन नरुटे, महिला पोलीस कर्मचारी गीतांजली लाड व शरद चोभे यांनी पार पाडली.

COMMENTS