शाही स्नानाला साधूंची गर्दी ; नियमांची पायमल्ली झाल्याने कोरोना संसर्गाची भीती

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शाही स्नानाला साधूंची गर्दी ; नियमांची पायमल्ली झाल्याने कोरोना संसर्गाची भीती

हरिद्वार येथे आयोजित करण्यात आलेल्या कुंभमेळ्यात आज दुसरे शाही स्नान होत आहे.

 शेतकऱ्याने पिकविली मेक्सिकन मिरची
संगमनेर औद्योगिक वसाहतीत सततच्या चोरीची घटना
चोपडा तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींसाठी 73 टक्के मतदान

नवी दिल्ली : हरिद्वार येथे आयोजित करण्यात आलेल्या कुंभमेळ्यात आज दुसरे शाही स्नान होत आहे. या शाही स्नानासाठी अनेक अखाड्यांतील साधू-संत आले आहेत. या वेळी कोरोना नियमांच्या पार चिंधड्या उडाल्या आहेत. अनेक साधूही कोरोनाबाधित आढळून आले आहेत. असे असतानाही उतराखंड पोलिस कोरोना नियमांची अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरले आहेत. कुंभमेळ्यासाठी आलेल्या पन्नास हजार लोकांची चाचणी करण्यात येत आहे. अनेक साधू बाधित आढळून आले आहेत. आणखीही चाचण्या करण्यात येत आहेत. 

मोठी गर्दी असल्याने अनेक ठिकाणी कोरोना नियमांचेही उल्लंघन होताना दिसून आले. येथे ना सोशल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसत आहे, ना कुणी मास्क लावताना दिसत आहे. कुंभमेळ्याचे आयजी संजय गुंज्याल यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाही स्नानासाठी सर्वात अगोदर आखाड्यांना परवानगी देण्यात आली. यानंतर 7 वाजल्यापासून सामान्य जनतेला स्नानाची परवानगी देण्यात आली. गुंज्याल यांनी म्हटले आहे, की आम्ही लोकांना सातत्याने कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत आहोत; मात्र आज मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्याने चालान देणे व्यवहारिकदृष्ट्या अशक्य आहे. घाटांवर कोरोना नियमांची अंमलबजावणी करणे अत्यंत कठीण आहे. आम्ही सोशल डिस्टंसिंगची अंमलबजावणी करायला सुरुवात केली, तर धावपळही उडू शकते. शाही स्नानाच्या एक दिवस आधीच उत्तराखंडमधून कोरोना रुग्णांचे भीतीदायक आकडे समोर येऊ लागले आहेत. गेल्या 24 तासांत 1,333 नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत, तर आठ जणांचा मृत्यू झाला आहे. डेहराडूनमध्ये 582, हरिद्वारमध्ये 386, नैनिताल येथे 122 नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. हर की पौडी येथे रविवारी नऊ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

COMMENTS