ओबीसी नेत्यांचे खून करण्यामागे आर‌एस‌एस का?

Homeताज्या बातम्यासंपादकीय

ओबीसी नेत्यांचे खून करण्यामागे आर‌एस‌एस का?

  केरळच्या सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया चे राज्य महासचिव के. एस. शान आणि भाजप ओबीसी मोर्चाचे केरळ प्रदेश सचिव रंजित या दोन्ही राजकीय व्यक्तींचे

कर्नाटकातील जातीय समीकरण
कर संकलनात वाढ, मात्र जनतेचे काय ?
मंदीचे वारे

  केरळच्या सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया चे राज्य महासचिव के. एस. शान आणि भाजप ओबीसी मोर्चाचे केरळ प्रदेश सचिव रंजित या दोन्ही राजकीय व्यक्तींचे लागोपाठ याच महिन्यात खून झाले. या दोन खूनाच्या घटनांनी आख्खे केरळ हादरले होते. त्यामुळे राज्याच्या अतिरिक्त पोलिस महासंचालक विजय साखरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची म्हणजे एस‌आयटी ची नियुक्ती करण्यात आली. केरळ राज्य आणि संबंध देशाचे लक्ष लागून असलेल्या या प्रकरणात विशेष तपास पथकाने युध्द स्तरावर तपास केला. या दोन्ही व्यक्तींच्या खूनप्रकरणी आर‌एस‌एस च्या पाच लोकांना ताब्यात घेण्यात आले. या खूनामागील मास्टर माईंड म्हणून केरळ च्या त्रिशूर जिल्ह्याचे आर‌एस‌एस चे बौध्दिक प्रमुख के. टी. सुरेश याला ताब्यात घेतले असल्याची माहिती एस‌आयटी चे प्रमुख तथा राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक विजय साखरे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. खूनाच्या या दोन्ही घटना भारतीय प्रसारमाध्यमांनी दुर्लक्षित केल्या आहेत. असो. केरळ हे राज्य देशातील सर्वाधिक साक्षर राज्य म्हणून ओळखले जाते. केरळ मधून ऍब्राॅड जाॅब करणाऱ्यांचे प्रमाणही अधिक. त्यात स्त्रियांचा सहभाग हा पुरूषांपेक्षा अधिक. या राज्याने आलटून पालटून काॅंग्रेस आणि कम्युनिस्ट या दोनच पक्षांच्या हाती सत्ता सोपवलेली. संघ-भाजपला या राज्यात अद्याप खातेही उघडता आलेले नाही; तरीही, आर‌एस‌एस च्या विघातक कारवाया येथे अधूनमधून डोके वर काढतात. संघाने त्यांची काय षडयंत्र रचली किंवा रचावी हे त्यांच त्यांना ठाव. परंतु, देशात ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात अत्यंत पराकाष्ठा होत असतानाच केरळमधील ओबीसी व्यक्तींचे खून होतात ही बाब अतिशय धक्कादायक होती. सोशल डेमोक्रॅटिक पार्टी चे के. एस. शान आणि भाजप ओबीसी मोर्चाचे रंजित या दोघांचे खून अतिशय नियोजनबद्ध असल्याचे पोलिसांना लक्षात आले होते. त्यामुळे त्यांनी विशेष पथकाची स्थापना केली. यात के. एस. शान यांचा खून १८ डिसेंबर ला झाला. त्यानंतर लगोलग भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव रंजित यांचाही खून होतो; या घटना एकूणच ओबीसींच्या आरक्षणाला प्राणपणाने विरोध करणाऱ्या शक्ती कोणत्या यावर शिक्कामोर्तब करणाऱ्या ठराव्यात, अशाच आहेत. ओबीसी समाजाने देखील आता सावध होणे गरजेचे आहे. भाजपचा ओबीसी मोर्चा निर्माण करून केरळ राज्यात आपल्या विस्ताराचे मनसुबे रचणा-या संघ-भाजपात ओबीसींची काय अवस्था होईल, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. एका बाजूला ओबीसी समाजाला आपल्या संघटनेत पदे देऊन दुसऱ्या बाजूला त्यांचा खात्मा करण्याचा संघ-भाजपचे षडयंत्र आता अपरिचित राहिले नाही. महाराष्ट्र राज्यातील ओबीसींना भाजपात आणून केवळ दोन खासदारांचा इतिहास असणाऱ्या भाजपला महाराष्ट्रात सत्तापदावर आणणारे गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूचे उघड रहस्य आजही ओबीसी समाजाला सतावतेय. पण तोडा, फोंडा, राज्य करा या ब्रिटीशांच्या उक्तीप्रमाणे राज्य करणाऱ्या संघ-परिवाराला या घटना उघड-रहस्य म्हणूनही कोणत्याही दुष्परिणामांना सामोरे जावे लागत नसल्याने, तशा प्रकारच्या अनेक घटनांना ते आकार देण्यासाठी सरसावले आहेत, असेच केरळच्या या घटनांवरून दिसते. राजकीय व्यापकता निर्माण करण्यासाठी भाजप ओबीसी मोर्चाचे राज्य सचिवाचा खून करण्यासाठी एका जिल्ह्यातील आर‌एस‌एस चा बौद्धिक प्रमुख मास्टर प्लॅन करतो, ही घटनाच ओबीसींना चीड आणणारी आहे. परंतु, सत्तेला चाटत बसण्यात अभिमान बाळगणारे आमचे बाटगे ओबीसी नेते या गंभीर घटना कधी लक्षात घेतील? ओबीसींचा केवळ वापर केला जात असून ओबीसी नेत्यांना कधी व्यक्तिमत्वाने तर कधी जिवाने संपविण्याचे षडयंत्र ब्राह्मणी शक्ती सातत्याने करित आहेत. संघ शक्ती या कडव्या ब्राह्मणी शक्ती असल्या तरी इतर पक्षातील साॅफ्ट म्हणून वावरणाऱ्या ब्राह्मणी शक्ती या देखील ओबीसींच्या जिवावरच उठल्या आहेत. या सर्वांचे ज्वलंत उदाहरण म्हणून आपण पाहिले तर, मंडल आयोगाच्या उदयाने उभे राहिलेले ओबीसी नेतृत्व ओबीसींच्या जातीनिहाय जनगणने पर्यंत येताच संघ-भाजपासह सर्व ब्राम्हणी शक्तिंनी ओबीसींचे राजकीय नेत्यांना देशोधडीला लावण्याचे कटकारस्थान सुरू केले. यात लालूप्रसाद यांना तुरूंगवासाचाही समावेश होतो. ओबीसी समाज बांधवांनी ब्राह्मणी हिंदुत्वाच्या जोखडीतून बाहेर पडावं आणि अवैदिक किंवा संत चळवळीचे धार्मिक अधिष्ठान स्विकारावे. ओबीसींच्या विरोधात संघ-भाजपने चालविलेले षडयंत्रात्मक कारस्थाने समजून घेण्याच्या प्रकारातच केरळच्या दोन्ही ओबीसी नेत्यांच्या खूनाचे संदर्भ असावेत. कारण केरळ एस‌आयटी लावलेल्या तपासात आर‌एस‌एस च्या बौध्दिक प्रमुखासह एकूण पाच जणांना ताब्यात घेतले जाते, तेव्हा याचा सरळ अर्थ हाच आहे की, ओबीसी समाजाला कुणाच्या वाटत  नेतृत्वाखाली सुरक्षितता नाही.

COMMENTS