Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुस्तके माणसाच्या विचारांना दिशा देतात…

माणसाच्या आयुष्यात अनेक गोष्टी त्याला घडवतात कुटुंब, समाज, मित्र, अनुभव आणि शिक्षण. परंतु या सर्वांमध्ये पुस्तकांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे.

पुस्तक वाचनाने माणूस घडतो-प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागरसौ. के.एस.के. महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 18 तास वाचन उपक्रम
महात्मा ज्योतिबा फुले समग्र क्रांतीचे प्रणेते-आनंद  गायकवाड
महिला महाविद्यालयात 18 तास सलग वाचन उपक्रम; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वाचन संस्कृतीचा जागर

माणसाच्या आयुष्यात अनेक गोष्टी त्याला घडवतात कुटुंब, समाज, मित्र, अनुभव आणि शिक्षण. परंतु या सर्वांमध्ये पुस्तकांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. माणूस कितीही श्रीमंत किंवा गरीब असो, पुस्तके त्याला ज्ञानाचा खजिना उपलब्ध करून देतात. पुस्तकांमुळे माणूस विचार करायला शिकतो, चांगले-वाईट ओळखतो आणि योग्य मार्ग निवडू शकतो. पुस्तके ही केवळ कागदावर छापलेली अक्षरे नसतात ती विचारांचे, अनुभवांचे आणि ज्ञानाचे भांडार असतात. लहानपणी आई-वडील, शिक्षक आणि वडीलधारी मंडळी आपल्याला गोष्टींची पुस्तके वाचायला देतात. त्या गोष्टींमधून आपल्याला चांगले-वाईट, प्रामाणिकपणा, धैर्य आणि मैत्री यांचे महत्त्व समजते. जसजसे आपण मोठे होतो, तसतशी पुस्तकेही बदलतात. विज्ञान, इतिहास, साहित्य, चरित्रे आणि प्रेरणादायी पुस्तके आपले विचार अधिक व्यापक करतात. पुस्तके माणसाच्या विचारांना दिशा देतात. एखादे चांगले पुस्तक वाचल्यावर आपण नवीन गोष्टी शिकतो, प्रश्‍न विचारायला शिकतो आणि स्वतःचा दृष्टिकोन तयार करतो. पुस्तकांमुळे माणूस केवळ ज्ञानी होत नाही, तर तो संवेदनशील आणि समजूतदार बनतो. इतिहासातील अनेक महान व्यक्तींच्या आयुष्यात पुस्तकांचे मोठे योगदान होते. त्यांनी वाचनातून प्रेरणा घेतली आणि स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवले. चरित्रे वाचल्यामुळे आपल्याला संघर्ष, मेहनत आणि चिकाटी यांचे महत्त्व कळते. साहित्य वाचल्यामुळे भाषा सुधारते, कल्पनाशक्ती वाढते आणि मन समृद्ध होते. पुस्तके माणसाला ज्ञान देतात. शालेय पुस्तकांमधून आपण शिक्षण घेतो, तर इतर पुस्तकांमधून जीवनाचे धडे शिकतो. महान व्यक्तींची चरित्रे वाचल्याने त्यांचे कष्ट, संघर्ष आणि यश यांची माहिती मिळते. त्यामुळे आपल्या मनात प्रेरणा निर्माण होते. कथा, कादंबर्‍या आणि धार्मिक ग्रंथांमधून सत्य, प्रामाणिकपणा, मेहनत, दया, प्रेम आणि सहकार्य यांसारख्या मूल्यांचे महत्त्व समजते. त्यामुळे माणूस अधिक संवेदनशील आणि जबाबदार बनतो. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल आणि इंटरनेट यांचा वापर वाढला असला तरी पुस्तकांचे महत्त्व अजूनही कमी झालेले नाही. उलट, योग्य पुस्तक वाचल्याने मन एकाग्र होते, विचार स्पष्ट होतात आणि वेळेचा सदुपयोग होतो. पुस्तक वाचणारी व्यक्ती अधिक आत्मविश्‍वासपूर्ण आणि सुजाण बनते. ज्या व्यक्तीला वाचनाची आवड असते, त्यांचे विचार समृद्ध आणि व्यक्तिमत्त्व प्रभावी असते. जीवनात अनेकदा अडचणी, संभ्रम आणि अपयश येते. पुस्तके माणसाला ज्ञान, संस्कार, विचारशक्ती आणि योग्य दिशा देतात. चांगली पुस्तके वाचल्याने माणसाचे व्यक्तिमत्त्व घडते, त्याचा आत्मविश्‍वास वाढतो आणि तो योग्य-अयोग्य यातील फरक ओळखू लागतो. त्यामुळे पुस्तक हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून जीवन घडविणारे मित्र आहे. प्रत्येकाने नियमित वाचनाची सवय लावली पाहिजे. पुस्तकांच्या सहवासातून माणूस अधिक समंजस, ज्ञानी आणि यशस्वी बनतो. म्हणूनच प्रत्येकाने दररोज थोडा वेळ पुस्तक वाचनासाठी राखून ठेवला पाहिजे. चांगली पुस्तके निवडून त्यांचे नियमित वाचन केले, तर आपले मन, विचार आणि व्यक्तिमत्त्व सुंदर रीतीने घडेल. आजच्या काळात चांगली पुस्तके वाचणे अधिक आवश्यक आहे.

श्रीकांत मगर
मो : 9689117169

COMMENTS