आयपीएल म्हणजे रोमांच, चौकार-षटकार आणि तुफान मनोरंजन! पण सध्या आयपीएलमध्ये 'काळ्या जादू'ची चर्चा रंगली आहे. एका चाहत्याने हातात लिंबू फिरवलं आणि प
आयपीएल म्हणजे रोमांच, चौकार-षटकार आणि तुफान मनोरंजन! पण सध्या आयपीएलमध्ये ‘काळ्या जादू’ची चर्चा रंगली आहे. एका चाहत्याने हातात लिंबू फिरवलं आणि पुढच्याच चेंडूवर विकेट पडली!
सोशल मीडियावर सनरायझर्स हैदराबादच्या एका चाहत्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात हा चाहता चक्क लिंबू घेऊन काही विचित्र हालचाली करताना दिसला. जणू काही तो मैदानावर ‘काळी जादू’च करत होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या चाहत्याने आपली ‘जादू’ पूर्ण करताच पुढच्या चेंडूवर चेन्नईचा फलंदाज बाद झाला! हे टायमिंग इतकं परफेक्ट होतं की पाहणारेही थक्क झाले. विकेट पडताच या चाहत्याने जो जल्लोष केला, तो पाहून शेजारी बसलेले लोकही हसू रोखू शकले नाहीत.
@GemsOfCricket ने शेअर केलेल्या या व्हिडिओवर आता मीम्सचा पूर आलाय. कुणी याला ‘लिंबू रिव्ह्यू सिस्टम’ म्हणतंय, तर कुणी विचारतंय की, ‘ही आयपीएल आहे की तंत्र-मंत्र लीग?’. एका युजरने तर सल्ला दिलाय की, ‘या चाहत्याला प्रत्येक मॅचला बोलवा, म्हणजे आपली टीम नक्की जिंकेल!’ हा केवळ एक योगायोग असला तरी, क्रिकेटच्या मैदानावरचा हा ‘लिंबू प्रयोग’ सध्या इंटरनेटवर राडा घालतोय!

COMMENTS