Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समर कॅम्पमुळे मुलं तणावमुक्त होतात : अध्यक्ष अनंत ढोले ढोले

पाथर्डी : परीक्षानंतर लहान मुलांना त्यांच्या मित्रांसमवेत खेळायला तसेच अभ्यासाव्यतिरिक्त इतर मनोरंजनात्मक उपक्रम शिकायला आवडते. पूर्वी उन्हाळ्याची सुट्टी लागली की मुलांना मामाच्या गावी जाऊन धमाल मस्ती करण्याचे वेध लागायचे पण आता काळाप्रमाणे सर्वच बदललं असून आता सुट्टीतील गावांची जागा समर कॅम्पने घेतली आहे. अभय आव्हाड सामाजिक प्रतिष्ठानने पाथर्डी शहरात मागील वर्षापासून सुरु केलेला पार्थ समर कॅम्प हा लहान मुलांसाठी स्तुत्य उपक्रम असून समर कॅम्प मुलांना परीक्षेनंतर तणावमुक्त होण्यास मदत करतात असे प्रतिपादन चैतन्य उद्योगसमूहाचे अध्यक्ष अनंत ढोले यांनी केले.  ते येथील विवेकानंद विद्या मंदिरच्या प्रांगणात अभय आव्हाड सामाजिक प्रतिष्ठान आयोजित पार्थ समर कॅम्प २.० च्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व पाथर्डीचे नगराध्यक्ष अभय आव्हाड, प्रा. रमेश मोरगावकर, अशोकराव चोरमले, संतोष डागा, भारतीताई असलकर, कुणाल आव्हाड, प्राचार्य डॉ बबन चौरे, मुख्याध्यापक शरद मेढे, अनुजा कुलकर्णी, डॉ विजय देशमुख, संपत घारे, ज्ञानेश्वर गायके आदी उपस्थित होते. यावेळी प्रा. रमेश मोरगावकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना समर कॅम्पचे महत्त्व अधोरेखित केले.  एक आठवडा चालणाऱ्या पार्थ समर कॅम्प मध्ये पाथर्डी शहरातील एकूण १२२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यांना प्रशिक्षित क्रीडा शिक्षकांकडून फुटबॉल, हॉलीबॉल, क्रिकेट, आर्चरी, योगाभ्यास आदी खेळांबरोबरच आर्ट अँड क्राफ्ट, सामान्यज्ञान, अबॅकस तसेच इंग्रजी फनी गेम्स व डान्स शिकवला जाणार आहे. सहभागी मुलांना दररोज पौष्टिक आहार दिला जाणार असून मुलांना आकर्षक बक्षीस दिले जाणार आहेत. पार्थ समर कॅम्प ची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली.उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक शरद मेढे, सूत्रसंचालन अनुजा कुलकर्णी तर आभार ज्ञानेश्वर गायके यांनी मानले.

खरिपाच्या यशस्वीततेसाठी सर्व विभागांचे प्रयत्न गरजेचे : आ.काळे; पूर्वनियोजन बैठकीत प्रशासनाला सूचना; खतटंचाई, हवामान बदलाचा आढावा
दहावी परीक्षेत जगदंबा विद्यालयाचे यश 
जामखेडमध्ये ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाचे सामूहिक वाचन

पाथर्डी : परीक्षानंतर लहान मुलांना त्यांच्या मित्रांसमवेत खेळायला तसेच अभ्यासाव्यतिरिक्त इतर मनोरंजनात्मक उपक्रम शिकायला आवडते. पूर्वी उन्हाळ्याची सुट्टी लागली की मुलांना मामाच्या गावी जाऊन धमाल मस्ती करण्याचे वेध लागायचे पण आता काळाप्रमाणे सर्वच बदललं असून आता सुट्टीतील गावांची जागा समर कॅम्पने घेतली आहे. अभय आव्हाड सामाजिक प्रतिष्ठानने पाथर्डी शहरात मागील वर्षापासून सुरु केलेला पार्थ समर कॅम्प हा लहान मुलांसाठी स्तुत्य उपक्रम असून समर कॅम्प मुलांना परीक्षेनंतर तणावमुक्त होण्यास मदत करतात असे प्रतिपादन चैतन्य उद्योगसमूहाचे अध्यक्ष अनंत ढोले यांनी केले. 

ते येथील विवेकानंद विद्या मंदिरच्या प्रांगणात अभय आव्हाड सामाजिक प्रतिष्ठान आयोजित पार्थ समर कॅम्प २.० च्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व पाथर्डीचे नगराध्यक्ष अभय आव्हाड, प्रा. रमेश मोरगावकर, अशोकराव चोरमले, संतोष डागा, भारतीताई असलकर, कुणाल आव्हाड, प्राचार्य डॉ बबन चौरे, मुख्याध्यापक शरद मेढे, अनुजा कुलकर्णी, डॉ विजय देशमुख, संपत घारे, ज्ञानेश्वर गायके आदी उपस्थित होते. यावेळी प्रा. रमेश मोरगावकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना समर कॅम्पचे महत्त्व अधोरेखित केले.

 एक आठवडा चालणाऱ्या पार्थ समर कॅम्प मध्ये पाथर्डी शहरातील एकूण १२२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यांना प्रशिक्षित क्रीडा शिक्षकांकडून फुटबॉल, हॉलीबॉल, क्रिकेट, आर्चरी, योगाभ्यास आदी खेळांबरोबरच आर्ट अँड क्राफ्ट, सामान्यज्ञान, अबॅकस तसेच इंग्रजी फनी गेम्स व डान्स शिकवला जाणार आहे. सहभागी मुलांना दररोज पौष्टिक आहार दिला जाणार असून मुलांना आकर्षक बक्षीस दिले जाणार आहेत. पार्थ समर कॅम्प ची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली.उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक शरद मेढे, सूत्रसंचालन अनुजा कुलकर्णी तर आभार ज्ञानेश्वर गायके यांनी मानले.

COMMENTS