कर्जत : आवास योजनेअंतर्गत कर्जत तालुक्यातील घरकुलांच्या पहिल्या हप्त्याचे शंभर टक्के वितरण पूर्ण झाले असल्याची माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजिंक्य सूर्यवंशी यांनी दिली. दरम्यान, ज्या घरकुलांची कामे अद्याप सुरू झालेली नाहीत, त्यांनी ३१ मार्चपूर्वी काम सुरू करावे, अन्यथा मंजुरी रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. सूर्यवंशी यांनी सांगितले की, केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २०२४-२५ व २०२५-२६ या कालावधीसाठी कर्जत तालुक्यास एकूण १३,८२१ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. पहिल्या हप्त्याचे प्रत्येकी १५ हजार रुपयांचे वितरण शंभर टक्के पूर्ण झाले असून, दुसऱ्या हप्त्याचे (७० हजार रुपये) वितरण आतापर्यंत ७,६५४ लाभार्थ्यांना करण्यात आले आहे. सध्या तालुक्यातील ५५.३८ टक्के घरकुले प्रगतीपथावर असून उर्वरित घरकुलांची कामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ३१ मार्च ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली असून, या कालावधीत काम सुरू न केल्यास संबंधित घरकुलाची मंजुरी रद्द केली जाणार आहे. तसेच पहिला हप्ता घेतल्यानंतरही काम सुरू न करणाऱ्या लाभार्थ्यांना १५ हजार रुपयांची रक्कम शासनाकडे परत जमा करावी लागणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. घरकुलांची कामे गतीमान करण्यासाठी तालुकास्तरावर २३ संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक अधिकाऱ्याला पाच ग्रामपंचायतींची जबाबदारी देण्यात आली आहे. हे अधिकारी ग्रामपंचायत स्तरावर बैठका घेऊन लाभार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. दरम्यान, गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अपूर्ण घरकुलांचे भूमिपूजन तर पूर्ण झालेल्या घरकुलांचा गृहप्रवेश सोहळा पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. या उपक्रमामुळे लाभार्थ्यांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने लाभार्थ्यांना मंजूर घरकुलांचे काम तात्काळ सुरू करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले असून, ३१ मार्चनंतर नियमांनुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकारी अजिंक्य सूर्यवंशी यांनी सांगितले.

कर्जत : आवास योजनेअंतर्गत कर्जत तालुक्यातील घरकुलांच्या पहिल्या हप्त्याचे शंभर टक्के वितरण पूर्ण झाले असल्याची माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजिंक्य सूर्यवंशी यांनी दिली. दरम्यान, ज्या घरकुलांची कामे अद्याप सुरू झालेली नाहीत, त्यांनी ३१ मार्चपूर्वी काम सुरू करावे, अन्यथा मंजुरी रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
सूर्यवंशी यांनी सांगितले की, केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २०२४-२५ व २०२५-२६ या कालावधीसाठी कर्जत तालुक्यास एकूण १३,८२१ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. पहिल्या हप्त्याचे प्रत्येकी १५ हजार रुपयांचे वितरण शंभर टक्के पूर्ण झाले असून, दुसऱ्या हप्त्याचे (७० हजार रुपये) वितरण आतापर्यंत ७,६५४ लाभार्थ्यांना करण्यात आले आहे.
सध्या तालुक्यातील ५५.३८ टक्के घरकुले प्रगतीपथावर असून उर्वरित घरकुलांची कामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ३१ मार्च ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली असून, या कालावधीत काम सुरू न केल्यास संबंधित घरकुलाची मंजुरी रद्द केली जाणार आहे. तसेच पहिला हप्ता घेतल्यानंतरही काम सुरू न करणाऱ्या लाभार्थ्यांना १५ हजार रुपयांची रक्कम शासनाकडे परत जमा करावी लागणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
घरकुलांची कामे गतीमान करण्यासाठी तालुकास्तरावर २३ संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक अधिकाऱ्याला पाच ग्रामपंचायतींची जबाबदारी देण्यात आली आहे. हे अधिकारी ग्रामपंचायत स्तरावर बैठका घेऊन लाभार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत.
दरम्यान, गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अपूर्ण घरकुलांचे भूमिपूजन तर पूर्ण झालेल्या घरकुलांचा गृहप्रवेश सोहळा पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. या उपक्रमामुळे लाभार्थ्यांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
प्रशासनाने लाभार्थ्यांना मंजूर घरकुलांचे काम तात्काळ सुरू करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले असून, ३१ मार्चनंतर नियमांनुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकारी अजिंक्य सूर्यवंशी यांनी सांगितले.

COMMENTS