Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

‘मी राजीनामा देणार नाही, आम्ही हरलोच नाही!’; बंगालमध्ये पराभवानंतरही ममता दीदींचा पवित्रा

पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. निवडणुकीच्या निकालात तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसल्यानंतर आता ममता बॅनर्जी यांन

ममतादीदींना अतिआत्मविश्‍वास नडला !
प.बंगालमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणार; भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांचा विश्‍वास
विधानपरिषदेसाठी विवेक कोल्हेंचे नाव येताच कोपरगावमध्ये जल्लोष
West Bengal Election: बंगाली अस्मितेवर कोणाची 'ममता'? घनघोर लढाईत कोण बाजी  मारणार, वाढलेला टक्का कोणाला झटका देणार?? | west bengal assembly election  results 2026 mamata banerjee ...

पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. निवडणुकीच्या निकालात तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसल्यानंतर आता ममता बॅनर्जी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. “मी राजीनामा देणार नाही आणि आम्ही निवडणूक हरलोच नाही,” असं म्हणत त्यांनी सर्वांनाच चकित केलं आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक मुसंडी मारली आहे. निकालाच्या सुरुवातीच्या कलांपासूनच भाजपने आपली पकड मजबूत केली होती. पंतप्रधान मोदींनी या विजयाबद्दल कार्यकर्त्यांचे अभिनंदनही केले आहे. मात्र, या सर्व घडामोडींदरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घेतलेली भूमिका आता भाजपची डोकेदुखी ठरू शकते.
पराभवानंतर बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ममता दीदींनी निवडणूक आयोग आणि भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, “माझ्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही.” त्यांच्या या विधानामुळे बंगालच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. निवडणुकीत मोठा पराभव समोर दिसत असूनही ममता बॅनर्जी यांनी विजयाचा दावा सोडलेला नाही.
एकीकडे भाजप नेते आणि कार्यकर्ते विजयाचा जल्लोष करत आहेत, तर दुसरीकडे ममता बॅनर्जींच्या या भूमिकेमुळे पेच निर्माण झाला आहे. आता पश्चिम बंगालचे राजकारण कोणत्या वळणावर जाते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
ममता बॅनर्जींच्या या वक्तव्यामुळे सत्तास्थापनेचा पेच अधिक वाढणार का? की भाजप आपला विजय अधिकृतपणे प्रस्थापित करणार? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल.

COMMENTS