विठुरायाच्या मंदिराला द्राक्षे आणि फुलांची आकर्षक सजावट

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विठुरायाच्या मंदिराला द्राक्षे आणि फुलांची आकर्षक सजावट

आमलकी एकादशीनिमित्त विठुरायाच्या मंदिराला द्राक्षे आणि फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

चाळीस हजारांची लाच घेतांना महिला सरपंचासह पतीस अटक
गौराईच्या स्थापनेत साकारला चंद्रयान-3 चा देखावा
रोहमारे महाविद्यालयातील विद्यार्थीनीस पारितोषिक प्रदान

सोलापूर : आमलकी एकादशीनिमित्त विठुरायाच्या मंदिराला द्राक्षे आणि फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. आकर्षक फुलांनी तयार केलेलं ‘जय हरी’ ‘राम कृष्ण हरी’ लक्ष वेधून घेत आहे.आज फाल्गुन शुद्ध अर्थात आमलकी एकादशीनिमित्त विठुरायाच्या मंदिराला द्राक्षे आणि फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.रांजणगाव येथील विठ्ठल भक्त नानासाहेब पाटील यांनी ही सेवा दिली आहे.

या सजावटीसाठी झेंडू, शेवंती, आर्केड ऍथोरियम, केळीचे खुंट या सोबत 100 किलो द्राक्षांचा वापर विठ्ठल-रुक्मिणी गाभारा सजवण्यासाठी करण्यात आला आहे.सध्या आपल्या बागेत पिकलेली द्राक्षे देवाच्या चरणी अर्पण करण्यासाठी अनेक भाविक येत असतात.मात्र नानासाहेब पाटील यांनी थेट द्राक्ष व फुलांच्या मदतीने आकर्षक सजावट केली आहे.

COMMENTS