ओबीसींचे संख्याबळ आणि जागृती डावलणारे वक्तव्य !

Homeताज्या बातम्यासंपादकीय

ओबीसींचे संख्याबळ आणि जागृती डावलणारे वक्तव्य !

महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्रिपद हे जा तिकडे कसा असावा याचं दुसऱ्यांदा वक्तव्य महाराष्ट्रात केले गेले आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री प्रथम म

पंढरपूर पोटनिवडणुकीत दोन्ही बाजुने पाण्यासारखा पैसा वाहणार : राजू शेट्टी
प्लास्टिकचा वापर टाळूया आणि पर्यावरण रक्षणाचा संकल्प करूया : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
दंगलखोरांना भाजप हिंदू म्हणते!

महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्रिपद हे जा तिकडे कसा असावा याचं दुसऱ्यांदा वक्तव्य महाराष्ट्रात केले गेले आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री प्रथम महाराष्ट्र भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ब्राह्मण व्हावा अशी इच्छा बोलून दाखवली. यापूर्वी वर्तमान काळात राष्ट्रवादीत असलेले एकनाथ खडसे यांनी देखील महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ओबीसी असायला हवा होता, असे वक्तव्य पंढरपुर मुक्कामी केले होते. त्या एका वक्तव्यामुळे एकनाथ खडसे यांची संपूर्ण राजकीय आयुष्याची धूळधाण करण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु संघटक असलेले आणि तितकीच मुस्तदी असलेले एकनाथ खडसे हे देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणाला आजही पूरून उरत आहेत. कदाचित एकनाथ खडसे यांच्या राजकीय वाताहतिला पाहत रावसाहेब दानवे यांच्यावरच दबाव निर्माण झाला की काय, म्हणून त्यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री थेट ब्राह्मण असावा असे वक्तव्य करून एक प्रकारे संघ, भाजप आणि त्याचबरोबर ब्राह्मण समुदायाच्या आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दबावात असल्याचे सुतोवाच एकप्रकारे केले आहे. खरेतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा ओबीसी असावा यात कोणतीही दुमत असण्याचे कारण नाही. महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर जी गदा आली कदाचित त्यास कारणीभूत ही देखील एक बाब आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आज पर्यंत ओबीसी समुदायातून झाला नाही; कांबळे ओबीसी हिताचे किंवा ओबीसींच्या समर्थनात राजकीय इच्छाशक्ती राज्यकर्त्यांकडून उभी राहत नाही यामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण संपवून सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण देखील धोक्यात आणले जात आहे. जात आहे. महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या एकूण राजकारणात ओबीसींची शक्ती ५० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक असतानाही सत्तेची महत्वपूर्ण पदे ओबीसी समाजाच्या हाती लागत नाही; ही बाब एखादा मुरब्बी अथवा ज्येष्ठ ओबीसी राजकीय नेता जरी बोलला तरी त्याचे काय हश्र होतात हे एकनाथ खडसे यांच्या राजकीय वर्तमानातून दिसून येते. रावसाहेब दानवे हे महाराष्ट्राच्या एकेकाळी रुलिंग कास्ट असणाऱ्या समुदायाशी निगडित असूनही त्यांच्यावर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोणत्या जातीचा असावा हे बोलण्याची जेव्हा पाळी येते तेव्हा, राजकीय दृष्ट्या त्यांची हतबलता यातून दिसून येते. दानवे यांच्या या वक्तव्याला उत्तर देताना अजित पवार यांनी सत्तेचा एक दर्प असणारे उत्तराची पुन्हा एकदा प्रचिती आणून दिली. त्यामुळे पवार हे म्हणतात की, मुख्यमंत्री तृतीयपंथी व्यक्ती देखील होऊ शकतो, कोणत्याही जाती – धर्माचा व्यक्ती मुख्यमंत्री होऊ शकतो अशा पद्धतीचे त्यांनी या वक्तव्याला प्रतिटोला दिला आहे. आज देशाचे आणि राज्याचे राजकारण हे ओबीसीमय झालेले असताना, दानवे यांची प्रतिक्रिया ही ओबीसींच्या राजकीय महत्त्वाकांक्षा आणि राजकीय जागृतीला दाबून टाकण्यासाठी आहे! कारण यातून त्यांना अप्रत्यक्ष हाच संदेश द्यायचा आहे की, महाराष्ट्राचे सत्ताकारण केवळ ब्राह्मण – मराठा जातींभोवतीच फिरू शकते, हा एकांगी दृष्टिकोन त्यांच्या वक्तव्यात दिसतो. ओबीसींचा आरक्षणातील ५२% चा अधिकार न मिळताच ओबीसींचे एकूणच आरक्षण संपविण्यासाठी देशभरातील सत्ताधारी जात वर्गाची जी अघोषित युती होत आहे, त्याची ही झलक म्हणजे राजकीय जुगलबंदी युक्त ही वक्तव्य होत. संख्या बलाने सर्वाधिक मोठ्या समुदायाचे एका बाजूला राजकीय आरक्षण संपवायचे आणि दुसऱ्या बाजूला कोण्या एका जातीचा मुख्यमंत्री होण्याचे वक्तव्य करायचे यात ओबीसींवर अन्याय करण्याची मनोवृत्ती काम करते, जे यापुढील काळात शक्य नाही!

COMMENTS