Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोकसभा निवडणुकीसाठी भरारी पथके तयार

1700 हून अधिक अधिक कर्मचारी, अधिकारी नियुक्त

राहुरी ः 37 अहमदनगर लोकसभा निवडणुकीसाठी 223 राहुरी विधानसभा मतदार संघातील निवडणूक प्रशासनाकडून अधिकारी, कर्मचार्‍याव्यतिरिक्त विविध भरारी पथके तय

आनंदऋषीजी महाराज प्रतिमेची पालखी मिरवणूक
वेस-सोयगाव तलावाच्या 9.98 कोटींच्या कामास मान्यता
आत्मा मालिकचा विश्‍वजीत देवकर देशात प्रथम

राहुरी ः 37 अहमदनगर लोकसभा निवडणुकीसाठी 223 राहुरी विधानसभा मतदार संघातील निवडणूक प्रशासनाकडून अधिकारी, कर्मचार्‍याव्यतिरिक्त विविध भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. एकूण 1 हजार 700 हून अधिक अधिकारी, कर्मचारी या निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या पार्श्‍वभूमीवर पुढील आठवड्यात निवडणूक निर्णय अधिकारी व वरिष्ठ निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांच्या उपस्थितीत अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. जिल्हा पुनर्वसन अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शाहूराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील, निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार विशाल सदनापूर, निवासी नायब तहसीलदार संध्या दळवी, नायब तहसीलदार सचिन औटी (संजय गांधी योजना) पुनम दंडिले, महसुल नायब तहसिलदार तसेच निवडणूक शाखेचे आचारसंहिता कक्षाचे प्रमुख व राहुरीचे गटविकास अधिकारी वैभव शिंदे, (ग्रामीण भाग), राहुरीचे मुख्याधिकारी ज्ञानेश्‍वर ठोंबरे (नगरपालिका क्षेत्र) यांच्यासह निवडणूक शाखेचे अनिल टेमक, प्रमोद वाघमारे, सनी लोखंडे आदी यात जातीने लक्ष देऊन आहेत. निवडणूक लोकसभा निवडणूक प्रक्रिया शांततेने व निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी व या काळात होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी राहुरी विधानसभा मतदारसंघातील 3 तालुक्यांमध्ये विविध प्रकारची 16 पथके तैनात करण्यात येणार असून याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मतदारांना पैशाचे आमिष, अवैधरित्या रोख रक्कम व अवैध साहित्याची वाहतूक व अन्य बेकायदेशीर बाबींना आळा घालण्यासाठी विशेष पथकांमध्ये प्रशासकीय अधिकार्‍यांसमवेत पोलीस आणि चित्रीकरण करणारी व्हिडिओग्राफर असे हे पथक संपूर्ण मतदारसंघातील 28 सेक्टर मध्ये फिरती राहणार आहेत. याशिवाय वांबोरी, मुळा डॅम फाटा आणि मिरी (ता- पाथर्डी ) येथे तपासणी नाका राहणार आहे. स्टॅटिक सर्विलन्स टीमची 6 पथके, फ्लाईंग स्क्वाड टीमची 6 पथके, व्हिडिओ सर्विलन्स टीमची 3 तर व्ही. व्ही .टी. चे तीन आणि अकाउंटिंगचे एक पथक या संपूर्ण निवडणूक काळात 24 तास कार्यरत राहणार आहे. मागील लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक चार चाकी वाहनातील मोठ्या रकमा याच भरारी पथकाकडून जप्त करण्यात आल्या होत्या . त्यावेळी अनेकांना पुरावे सादर करायला नाकी नऊ आले होते. एकंदरीतच 18 एप्रिल पासून अहमदनगर लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याने या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे राहुरी मतदार संघातील राहुरी (178 मतदान केंद्र), नगर (70 मतदानकेंद्र ), पाथर्डी (59 मतदानकेंद्र) तालुक्यात या भरारी पथकांची नजर मात्र 307 मतदार केंद्राभोवती आतापासूनच असणार आहे.

COMMENTS