Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलीस नाईकास लाच घेताना रंगेहाथ पकडले

इचलकरंजी / प्रतिनिधी : दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना शहापूर पोलीस ठाण्यातील एका पोलीस नाईकास लाचलुचपत प्रत

लोणंद येथे रन विथ बोल्ट द जिम फलकाचे अनावरण; 31 जुलै रोजी धावणार मॅरेथॉन
अज्ञात वाहनाच्या धडकेत संतकृपा शिक्षण संस्थेचे संस्थापक अशोकराव भावके ठार
इस्लामपूर येथे राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन

इचलकरंजी / प्रतिनिधी : दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना शहापूर पोलीस ठाण्यातील एका पोलीस नाईकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरूवार, दि. 30 रोजी सकाळी अकराच्या सुमारास कोरोची येथे करण्यात आली. कारवाईमुळे शहापूर पोलीस ठाणे व शहरातील शासकीय कार्यालयांमध्ये खळबळ उडाली. पोलीस नाईक पांडुरंग लक्ष्मण गुरव (रा. हळदकर बंगला, खानापूर ता. भुदरगड जि. कोल्हापूर, मुळगाव पिरळ ता. राधानगरी) असे त्या पोलीस कर्मचार्‍याचे नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, संगमनगर तारदाळ येथे दीड महिन्यापूर्वी गुन्हा घडला होता. त्यानुसार तक्रारदार यांच्या आईविरुध्द शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्यांमध्ये मदत करण्यासाठी पोलीस नाईक पांडुरंग लक्ष्मण गुरव यांनी तक्रारदारांकडे चार हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. यानंतर पोलीस नाईक पांडुरंग गुरव याने गुरुवारी सकाळी तक्रारदारास पैसे देण्यासाठी कोरोची येथे बोलाविले होते. त्यानुसार पथकाने या ठिकाणी सापळा रचून चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्याला रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलीस निरीक्षक सतीश मोरे, संजीव बंबरगेकर, अजय चव्हाण, विकास माने, सुनिल घोसाळकर, नवनाथ कदम, मयूर देसाई यांच्या पथकाने केली.

COMMENTS