Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रवरेच्या दोघांची राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धेसाठी निवड; दाढ बुद्रुक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश

लोणी : लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या दाढ बुद्रुक येथील महात्मा फुले माध्यमिक विद्यालय, प्राथमिक विभा

स्व. विखे पाटलांचे दुष्काळमुक्तीचे स्वप्न ना. राधाकृष्ण विखेंनी पूर्ण करावे; ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे प्रतिपादन
अकोलेत युरियाचा ३३५ टन बफर साठा उपलब्धग्राहक पंचायतच्या पाठपुराव्याला यश; ५१ कृषी सेवा केंद्रांवर वितरण सुरू
राजुरी येथे प्रवरेच्या कृषिदूतांकडून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
प्रवरेच्या दोन विद्यार्थ्याची राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धेसाठी निवड

लोणी : लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या दाढ बुद्रुक येथील महात्मा फुले माध्यमिक विद्यालय, प्राथमिक विभाग व कनिष्ठ महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांची राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धेसाठी निवड झाल्याची माहिती प्राचार्य दीपक डेंगळे यांनी दिली.

तेलंगणा येथे आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धेसाठी विद्यालयातील सूरज सोमनाथ पवार आणि ऋतुजा रामनाथ पांळदे या खेळाडूंची निवड झाली आहे. या घवघवीत यशामुळे विद्यालयासह संपूर्ण प्रवरा परिसरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या यशस्वी खेळाडूंना क्रीडा संचालक दादासाहेब तुपे तसेच नितीन साबळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या खेळातील कौशल्याला योग्य दिशा देण्यासाठी संस्थेमार्फत सातत्याने विशेष प्रशिक्षण आणि आवश्यक क्रीडा सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अणासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्यासह प्रवरा संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी खेळाडूंचे विशेष अभिनंदन करून त्यांना राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

COMMENTS