Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भागूजीराव ढेकळे विद्यालयाचा बारावीचा शेकडा निकाल 96.67%

गेवराई : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ, छत्रपती संभाजीनगर विभागाच्या वतीने फेब्रुवारी 2026 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा नि

धानोरा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एच एस सी परीक्षेत मारली बाजी
फुगलेला बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जागेवर आला, जिल्हाधिकार्‍यांच्या प्रयत्नाला यश, कॉपीमुक्त मोहिमेमुळे निकालाची घसरण
दादा पाटील महाविद्यालयाचा उत्कृष्ट निकाल

गेवराई : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ, छत्रपती संभाजीनगर विभागाच्या वतीने फेब्रुवारी 2026 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून पाडळसिंगी येथील कृषि पंडित भागूजीराव ढेकळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा शेकडा निकाल 96.67% इतका लागला असून यावर्षी पण या कनिष्ठ महाविद्यालयाने उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.
कृषि पंडित भागूजीराव ढेकळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातून इ.12 वीच्या परीक्षेला विज्ञान शाखेचे 146 पैकी 146 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शेकडा निकाल 100% टक्के आणि वाणिज्य शाखेचे 51 पैकी 50 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शेकडा निकाल 98.03% तर कला शाखेचे 74 पैकी 66 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शेकडा निकाल 89.18% एवढा लागला असून गुणानुक्रमे विज्ञान शाखेतून प्रथम कु. शेख अल्विना फातेमा शेख मसरूर अन्वर 89.83%, द्वितीय कु. पिसाळ अनुष्का करन 85.67%, तृतीय चि. शिंदे रूद्रप्रताप संतोष 84.67%, कला शाखेतून प्रथम कु. शिंदे श्रद्धा लक्ष्मण 79.83%, द्वितीय चि. पवार यश सुनिल 78.17%, तृतीय चि. मोरे अभिषेक रमेश 77.50%, आणि वाणिज्य शाखेतून प्रथम कु. कोकाट पल्लवी बळीराम 78.83%, द्वितीय कु. दिंडे शिवकन्या एकनाथ 75.00%, तृतीय कु. माने ऋतुजा कमळाजी 71.67% घेवून उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान, कला, वाणिज्य या तिन्ही शाखेतून प्रथम येण्याचा मान मुलींनीच मिळविला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आदर्श शिक्षण संस्थेचे सचिव माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, युवा नेते रोहित क्षीरसागर, संस्थेचे प्रशासन अधिकारी डॉ. राजा मचाले, सहाय्यक प्रशासन अधिकारी योगेश पवार, कार्यवाहक एम. ए. राऊत, कृषि पंडित भागूजीराव ढेकळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य थिटे ए. एस., पर्यवेक्षक राजेंद्र रांजवण, राजेंद्र सोनवणे, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रामस्थांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

COMMENTS