Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जनसेवा हीच ईश्वर सेवा.-प्रकाश चोले; फळ वाटप करुन वाढदिवस साजरा

बीड : सामाजिक क्षेत्रात आघाडीवर असलेले ग्रामसुराज्य फाऊंडेशन छञपती संभानगरचे  संचालक  तथा आपल्या कुशल नियोजनातून येणार्‍या काही काळात घाटसावळी ये

घाटसावळीत ना. पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जल्लोषवृद्धाश्रम, व्यसनमुक्ती केंद्र, वृक्षसंवर्धन व विद्यार्थ्यांना मदतीचा हात
घाटसावळी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरायोग समृद्ध आयुष्याची गुरुकिल्ली – चंद्रकांत फड
महामार्गाच्या कामाबद्दल तक्रारी; खा.बजरंग सोनवणे करणार कामाची पाहणीतेलगाव-बीड राष्ट्रीय महामार्गातील अनेक कामे प्रलंबित

बीड : सामाजिक क्षेत्रात आघाडीवर असलेले ग्रामसुराज्य फाऊंडेशन छञपती संभानगरचे  संचालक  तथा आपल्या कुशल नियोजनातून येणार्‍या काही काळात घाटसावळी येथील तलावाचे अधुनिकरण करणारे प्रकाश चोले यांनी आपला वाढदिवस फळ वाटप करून साजरा केला.
श्री, विठ्ठल रुक्मिणी सेवाभावी संस्था पोखरी संचलित  घाटसावळी ता.बीड. येथील लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब वृद्धाश्रम येथे फळ वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला पुढे बोलताना चोले म्हणाले की संस्थेचे मुख्य प्रवर्तक  बीड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजीराव फड तथा युवा नेते चंद्रकांत फड व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नितीन फड यांच्या नेटक्या,व अत्यंत छान संकल्पनेतुन  व सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून घाटसावळीच्या निसर्गरम्य  डोंगरकुशीत हिरवळीत व छान नैसर्गिक हवेशीर वातावरणात आज 25 हुन अधिक आज्जी आजोबा या ठिकाणी आश्रय घेत आहेत.अशीच समाज सेवा व पुण्याई घडो,असे गौरवोद्गार  केले, पुढे फळ वाटपानंतर वृद्धांच्या समस्यांवर प्रकाश टाकत ते म्हणाले समाजासाठी व जिवनात आज्जी आजोबा यांचे योगदान ओळखणे गरजेचे आहे.आज  जगातील वृद्ध लोकांबद्दल जागरुकता निर्माण केली पाहिजे   मी या समाधानी सेवेत मी सुख आत्मशांती शोधली आहे  कार्यक्रमासाठी विठ्ठल नाना शिंदे, अमोल वडतिले, संतोष लांडे, प्रकाश लांडे, राधेश्याम फड,उत्तम फड राहुल आठवले योगेश फड, बारीक फड, संदीप फड, हे उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या  यशस्वितेसाठी सर्वश्री गोरख फड, अमोल नेहरकर,,सहादेव फड, रामनाथ मुळे वर्षा शेरकर यांनी परीश्रम घेतले.

COMMENTS