Homeताज्या बातम्या

श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे बुधवारी ह.भ.प. पांडुरंग महाराज उगले यांचे कीर्तन; गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

बीड: विसाव्या शतकातील महान संत किसनबाबा यांच्या २८ व्या वर्षातील १२ व्या पुण्यतिथीनिमित्त आषाढ शुद्ध पौर्णिमेच्या (गुरुपौर्णिमा) पावन पर्वावर श्र

आदिवासी भागात पाणी पुरवठा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी; पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे प्रशासनाला निर्देश
नवनियुक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील संघाच्या कार्यक्रमाला हजर राहिल्याने काँग्रेसची टीका
जमिनीच्या वर्ग-१ नोंदीसाठी उपोषणाचा इशारा; शेवगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाची घोषणा

बीड: विसाव्या शतकातील महान संत किसनबाबा यांच्या २८ व्या वर्षातील १२ व्या पुण्यतिथीनिमित्त आषाढ शुद्ध पौर्णिमेच्या (गुरुपौर्णिमा) पावन पर्वावर श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडी, ता. जि. बीड येथे विविध धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

या उत्सवाच्या निमित्ताने बुधवार, दि. २९ जुलै २०२६ रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत बीड येथील प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. पांडुरंग महाराज उगले यांचे सुश्राव्य कीर्तन होणार असून, त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

सोहळ्याची सुरुवात सकाळी ८ वाजता संत किसनबाबा यांच्या पालखी सोहळ्याने होईल. त्यानंतर सकाळी ९ ते १० या वेळेत श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथील गर्भांद्री पर्वत प्रदक्षिणेत भाविकांना सहभागी होता येणार आहे. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून ज्या भाविकांना बाबांकडून गुरुमंत्र घ्यावयाचा आहे, त्यांच्यासाठी सकाळी ७ ते ८ आणि दुपारी २ ते ५ या वेळेत गुरुमंत्र दीक्षा सोहळा पार पडणार आहे.

तरी परिसरातील सर्व भाविक भक्तांनी कीर्तन, पालखी सोहळा, पर्वत प्रदक्षिणा, गुरुमंत्र दीक्षा तसेच महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे भावपूर्ण आवाहन श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडीचे गुरुवर्य शांतीब्रह्म ह.भ.प. नवनाथ महाराज आणि समस्त गावकरी मंडळी, बकरवाडी (ता. जि. बीड) यांच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS