Homeताज्या बातम्या

किशोरकुमार यांच्या जयंतीनिमित्त बीडमध्ये ‘किशोर कुमार की यादे’ मोफत संगीतमय कार्यक्रम

बीड : सिनेमासृष्टीतील महान गायक, संगीतकार आणि अष्टपैलू कलाकार किशोरकुमार यांच्या जयंतीनिमित्त रविवारी, ९ ऑगस्ट रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथ

हिंदू खाटीक समाजासाठी कर्ज व अनुदान योजनांसाठी अर्ज मागविले; नांदेड जिल्हा कार्यालयाचे आवाहन
किनवट कृषी उत्पन्न बाजार समितीत राजकीय नाट्य! अविश्वास प्रस्तावाला उच्च न्यायालयाची स्थगिती मिळताच १४ संचालकांचे सामूहिक राजीनाम्याचे अस्त्र?
शिवसेना अहिल्यानगर जिल्हा सोशल मीडिया प्रमुखपदी कपिले

बीड : सिनेमासृष्टीतील महान गायक, संगीतकार आणि अष्टपैलू कलाकार किशोरकुमार यांच्या जयंतीनिमित्त रविवारी, ९ ऑगस्ट रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे कलाकार ग्रुपच्या वतीने ‘किशोर कुमार की यादे’ या नव्या-जुन्या चित्रपट गीतांच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे संयोजक बबनराव वडमारे आहेत.

या कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस निरीक्षक अशोक मुदीराज यांच्या हस्ते होणार असून, ‘लोकदिशा’चे संपादक किशोर कागदे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या संगीतमय सोहळ्यात अनेक लोकप्रिय मराठी आणि हिंदी गीतांचे सादरीकरण केले जाणार आहे.

हा कार्यक्रम सर्वांसाठी पूर्णपणे मोफत असून नागरिकांनी व संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बबन वडमारे, ॲड. अविनाश गडगे, डॉ. सुधीर साळवे, राजू जोसेफ, विनोद सवाई आणि शाम माने यांच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS