जामखेड : जामखेड शहरातील रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासंदर्भात नागरिकांसह विरोधकांकडून अनेक टीकात्मक प्रश्न बोलले जात आहेत. आ. रोहित पवार यांनी विरोधकांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले. विकासकामांमध्ये राजकारण न करता जनहिताला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे आ. रोहित पवार यांनी स्पष्ट केले.दि १२ मे रोजी जामखेडमध्ये सुरू असलेल्या विविध विकासकामांची आ. रोहित पवार यांनी पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाचे नवे कार्यालय, अत्याधुनिक एसटी स्थानक, व्यापारी संकुल, महसूल कर्मचाऱ्यांची निवासस्थाने, जिल्हा उपरुग्णालय, जलशुद्धीकरण केंद्र तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या कामांचा आढावा घेत त्यांनी विकासकामे दर्जेदार, गतिमान आणि लोकाभिमुख पद्धतीने पूर्ण करण्यावर भर देण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.यावेळी जामखेड शहरासह तालुक्यातील नागरिकांच्या शासकीय विश्रामगृहावर अडचणीही ऐकुण घेतल्या व अडचणी सोडविण्यासाठी संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी व नागरिकांशी संवाद साधला. युवकांना स्थानिक पातळीवर रोजगार आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने सुमारे ११.५ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या १५० गाळ्यांच्या व्यापारी संकुलाच्या कामाची पाहणी केली. तसेच महसूल कर्मचाऱ्यांसाठी उभारण्यात येत असलेल्या निवासस्थानांच्या कामाचाही त्यांनी आढावा घेतला. जिल्हा उपरुग्णालयाच्या चालू असलेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करत त्यांनी आरोग्य सुविधांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. रुग्णांना दर्जेदार आणि तत्पर आरोग्यसेवांसाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. तसेच जामखेड शहराला शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने लेहणेवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करून तेथील अडचणींचाही त्यांनी आढावा घेतला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते राजेंद्र कोठारी, अमोल राळेभात, शहाजी राळेभात, रमेश आजबे, वैजिनाथ पोले, सागर कोल्हे, लक्ष्मण ढेपे, नगरसेवक राजेंद्र गोरे, वसीम सय्यद, प्रशांत राळेभात, कुंडल राळेभात, संदीप गायकवाड, हरीभाऊ आजबे, दादा उगले, बजरंग डुचे यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS