माजलगाव: निर्भीड पत्रकार संघाच्या परळी तालुक्याच्या अध्यक्षपदी बालाजी ढगे तसेच उपाध्यक्षपदी कृष्णा सरवदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. स


माजलगाव: निर्भीड पत्रकार संघाच्या परळी तालुक्याच्या अध्यक्षपदी बालाजी ढगे तसेच उपाध्यक्षपदी कृष्णा सरवदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संघटनेच्या पदाधिकार्यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत ही निवड सर्वानुमते करण्यात आली.
संघाच्या संस्थापक अध्यक्षा रुचिता र. मलबारी यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती प्रक्रिया पार पडली. यावेळी प्रदेशाध्यक्ष देवेंद्र ढाका, जिल्हाध्यक्ष परमेश्वर सोळंके, जिल्हा उपाध्यक्ष अमरजी साळवे, ज्येष्ठ पत्रकार प्रचंड सोळंके, पृथ्वीराज निर्मळ, माजलगाव तालुकाध्यक्ष बाळासाहेब आडागळे, माजलगाव सोशल मीडिया तालुकाध्यक्ष बाळासाहेब फपाळ, किल्ले धारूर सोशल मीडिया तालुकाध्यक्ष गोवर्धनजी बडे, माजलगाव शहराध्यक्ष जगन्नाथ खेत्री, माजलगाव तालुका उपाध्यक्ष शेख हमीद, माजलगाव तालुका सचिव शेख अलीम यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत संघटनेच्या आगामी वाटचालीबाबत, पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर तसेच संघटन बळकट करण्याच्या दृष्टीने सविस्तर चर्चा करण्यात आली. उपस्थित सर्व सदस्यांनी बालाजी ढगे आणि कृष्णा सरवदे यांच्या निवडीचे स्वागत करत त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
नवनियुक्त अध्यक्ष बालाजी ढगे यांनी संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण, पत्रकारांमधील एकोपा वाढविणे आणि सामाजिक बांधिलकी जपत प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. उपाध्यक्ष कृष्णा सरवदे यांनीही संघटनेच्या ध्येय-धोरणांनुसार कार्य करून पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. बैठकीच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी नवनियुक्त पदाधिकार्यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

COMMENTS