माजलगाव: निर्भीड पत्रकार संघाच्या संघटनात्मक विस्ताराला अधिक बळकटी देण्यासाठी किल्ले धारूर तालुक्याच्या सोशल मीडिया तालुका अध्यक्षपदी ज्येष्ठ संप

माजलगाव: निर्भीड पत्रकार संघाच्या संघटनात्मक विस्ताराला अधिक बळकटी देण्यासाठी किल्ले धारूर तालुक्याच्या सोशल मीडिया तालुका अध्यक्षपदी ज्येष्ठ संपादक तथा सामाजिक प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविणारे गोवर्धन बडे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे तालुक्यातील पत्रकारांना सक्षम नेतृत्व मिळणार असून संघटनेच्या कार्याला अधिक गती मिळेल, असा विश्वास पदाधिकार्यांनी व्यक्त केला.
माजलगाव येथे निर्भीड पत्रकार संघाच्या पदाधिकार्यांची बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. संस्थापक अध्यक्षा रुचिता र. मलबारी यांच्या सूचनेनुसार, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र ढाका, जिल्हाध्यक्ष परमेश्वर सोळंके आणि जिल्हा उपाध्यक्ष अमरजी साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण, त्यांच्या विविध प्रश्नांना शासन-प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे आणि डिजिटल माध्यमातून संघटनेचे कार्य अधिक व्यापक करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. याच बैठकीत गोवर्धन बडे यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले.
गोवर्धन बडे यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक आणि लोकहिताच्या अनेक विषयांना सातत्याने वाचा फोडली आहे. सर्वसामान्यांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे पदाधिकार्यांनी सांगितले.
नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना गोवर्धन बडे म्हणाले, “निर्भीड पत्रकार संघाने माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी सर्व वरिष्ठ पदाधिकार्यांचा मनःपूर्वक आभारी आहे. सोशल मीडिया हे आजच्या काळातील प्रभावी माध्यम असून, त्याचा सकारात्मक वापर करून पत्रकारांचे प्रश्न, संघटनेचे उपक्रम आणि समाजहिताचे विषय जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी मी कटिबद्ध राहीन.”
या निवडीचे पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी स्वागत केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष देवेंद्र ढाका, जिल्हाध्यक्ष परमेश्वर सोळंके, जिल्हा उपाध्यक्ष अमरजी साळवे, तालुकाध्यक्ष बाळासाहेब आडागळे, तालुका उपाध्यक्ष शेख आम्हीद, सोशल मीडिया माजलगाव तालुका अध्यक्ष बालासाहेब फपाळ, ज्येष्ठ संपादक प्रचंड सोळंके तसेच संघटनेचे अनेक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. बैठकीचा समारोप पत्रकारांच्या हितासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करण्याच्या निर्धाराने करण्यात आला.

COMMENTS