शेवगाव : केंद्र व राज्य शासनाच्या जनहितार्थ योजनांचा लाभ तळागाळातील गरजू नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता कक्ष’ मोलाची भूमिका बजावेल, असा ठाम विश्वास शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी व्यक्त केला. शिवसेना ही ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या ब्रीदावर कार्य करणारा पक्ष असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले. शेवगाव येथे जिल्हा परिषदेच्या माजी सभापती हर्षदा काकडे व ऍड. शिवाजीराव काकडे यांच्या पुढाकारातून ‘धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता कक्ष’ तसेच जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संजय मोरे यांच्या हस्ते सोमवारी (दि. ३०) पार पडले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला शिवसेनेचे प्रवक्ते संजीव भोर, जिल्हाध्यक्ष बाबुशेठ टायरवाले, प्रवीण घुले, संदेश कार्ले, रामदास भोर, दीपक जंजिरे, अंकुश चितळे, अरुण मुंढे, तालुका अध्यक्ष आशुतोष डहाळे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख साईनाथ आधाट, दिलीप भागवत, एकनाथ कुसळकर, रणजित परदेशी, बाळासाहेब मडके, राज भुसे, जगन्नाथ गावडे, राम पोटफोडे, लक्ष्मण गवळी, रोहित काथवटे, संजय देशपांडे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी ऍड. शिवाजीराव काकडे यांनी सांगितले की, तालुक्यात अनेक वर्षांपासून विविध पक्ष व लोकप्रतिनिधी असतानाही सामान्य नागरिकांचे प्रश्न प्रलंबितच आहेत. या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी शिवसेना ही प्रभावी ताकद ठरणार आहे. ताजनापूर टप्पा दोनचे अपूर्ण काम पूर्ण करणे, बंधारे पाण्याने भरून देणे, बोधेगाव व सुकळी या दुष्काळी भागांना पाणी उपलब्ध करून देणे तसेच तरुणांना रोजगार मिळावा यासाठी एमआयडीसी उभारणी करणे, हा आमचा प्रमुख अजेंडा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब सातपुते यांनी केले, तर आभार हर्षदा काकडे यांनी मानले.

शेवगाव : केंद्र व राज्य शासनाच्या जनहितार्थ योजनांचा लाभ तळागाळातील गरजू नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता कक्ष’ मोलाची भूमिका बजावेल, असा ठाम विश्वास शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी व्यक्त केला. शिवसेना ही ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या ब्रीदावर कार्य करणारा पक्ष असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
शेवगाव येथे जिल्हा परिषदेच्या माजी सभापती हर्षदा काकडे व ऍड. शिवाजीराव काकडे यांच्या पुढाकारातून ‘धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता कक्ष’ तसेच जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संजय मोरे यांच्या हस्ते सोमवारी (दि. ३०) पार पडले. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला शिवसेनेचे प्रवक्ते संजीव भोर, जिल्हाध्यक्ष बाबुशेठ टायरवाले, प्रवीण घुले, संदेश कार्ले, रामदास भोर, दीपक जंजिरे, अंकुश चितळे, अरुण मुंढे, तालुका अध्यक्ष आशुतोष डहाळे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख साईनाथ आधाट, दिलीप भागवत, एकनाथ कुसळकर, रणजित परदेशी, बाळासाहेब मडके, राज भुसे, जगन्नाथ गावडे, राम पोटफोडे, लक्ष्मण गवळी, रोहित काथवटे, संजय देशपांडे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी ऍड. शिवाजीराव काकडे यांनी सांगितले की, तालुक्यात अनेक वर्षांपासून विविध पक्ष व लोकप्रतिनिधी असतानाही सामान्य नागरिकांचे प्रश्न प्रलंबितच आहेत. या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी शिवसेना ही प्रभावी ताकद ठरणार आहे. ताजनापूर टप्पा दोनचे अपूर्ण काम पूर्ण करणे, बंधारे पाण्याने भरून देणे, बोधेगाव व सुकळी या दुष्काळी भागांना पाणी उपलब्ध करून देणे तसेच तरुणांना रोजगार मिळावा यासाठी एमआयडीसी उभारणी करणे, हा आमचा प्रमुख अजेंडा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब सातपुते यांनी केले, तर आभार हर्षदा काकडे यांनी मानले.

COMMENTS