Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काष्टी येथे राज्यातील पहिले खाजगी पशुवैद्यकीय महाविद्यालय

श्रीगोंदा : काष्टी येथील नामदार बबनराव पाचपुते विचारधारा ट्रस्ट संचलित परिक्रमा शैक्षणिक संकुलात शैक्षणिक वर्ष २०२६–२७ पासून राज्यातील पहिले खाजगी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला केंद्र सरकारची मान्यता मिळाल्याची माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ॲड. प्रतापसिंह पाचपुते यांनी दिली.  हे महाविद्यालय महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांच्याशी संलग्न राहणार असून, विद्यापीठाचे संलग्नता पत्र, राज्य शासनाचे ना-हरकत प्रमाणपत्र तसेच केंद्र सरकारचे परवानगीपत्र प्राप्त झाले आहे. यासोबतच भारतीय पशुवैद्यकीय परिषद  यांची मान्यता मिळाल्याने महाविद्यालय सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाविद्यालयात प्रारंभी ८० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार असून दर्जेदार शिक्षणासाठी आवश्यक सर्व पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रशस्त स्वतंत्र इमारत, आधुनिक प्रयोगशाळा, सुसज्ज ग्रंथालय, पशुचिकित्सा दवाखाना, मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह, खेळाचे मैदान तसेच बस सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अनुभवी प्राध्यापक व कर्मचारीवर्गाची नियुक्ती करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. परिक्रमा शैक्षणिक संकुलात यापूर्वीच सीबीएसई शाळा, तंत्रनिकेतन, फार्मसी, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, बीबीए, बीसीए, एमसीए, विधी महाविद्यालय तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये कार्यरत आहेत. पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या सुरूवातीमुळे संकुलाने आणखी एक शैक्षणिक टप्पा गाठला आहे. या महाविद्यालयामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना पशुवैद्यकीय शिक्षणासाठी बाहेर जावे लागणार नाही, तसेच ग्रामीण व कृषी क्षेत्राशी संबंधित करिअरच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी परिक्रमा शैक्षणिक संकुलास भेट द्यावी, असे आवाहन महाविद्यालयाचे डीन डॉ. के. एस. रिसम यांनी केले आहे.

नागवडे कारखान्याच्या संचालकपदी आळेकर
मंथन परीक्षेत श्रीगोंदा माध्यमिक विद्यालयाचे यश  
प्रा. भुजबळ ‘रयत’शी बांधिलकी जपणारे आदर्श शिक्षक : भोस

श्रीगोंदा : काष्टी येथील नामदार बबनराव पाचपुते विचारधारा ट्रस्ट संचलित परिक्रमा शैक्षणिक संकुलात शैक्षणिक वर्ष २०२६–२७ पासून राज्यातील पहिले खाजगी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला केंद्र सरकारची मान्यता मिळाल्याची माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ॲड. प्रतापसिंह पाचपुते यांनी दिली.

 हे महाविद्यालय महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांच्याशी संलग्न राहणार असून, विद्यापीठाचे संलग्नता पत्र, राज्य शासनाचे ना-हरकत प्रमाणपत्र तसेच केंद्र सरकारचे परवानगीपत्र प्राप्त झाले आहे. यासोबतच भारतीय पशुवैद्यकीय परिषद  यांची मान्यता मिळाल्याने महाविद्यालय सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

महाविद्यालयात प्रारंभी ८० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार असून दर्जेदार शिक्षणासाठी आवश्यक सर्व पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रशस्त स्वतंत्र इमारत, आधुनिक प्रयोगशाळा, सुसज्ज ग्रंथालय, पशुचिकित्सा दवाखाना, मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह, खेळाचे मैदान तसेच बस सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अनुभवी प्राध्यापक व कर्मचारीवर्गाची नियुक्ती करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

परिक्रमा शैक्षणिक संकुलात यापूर्वीच सीबीएसई शाळा, तंत्रनिकेतन, फार्मसी, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, बीबीए, बीसीए, एमसीए, विधी महाविद्यालय तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये कार्यरत आहेत. पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या सुरूवातीमुळे संकुलाने आणखी एक शैक्षणिक टप्पा गाठला आहे.

या महाविद्यालयामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना पशुवैद्यकीय शिक्षणासाठी बाहेर जावे लागणार नाही, तसेच ग्रामीण व कृषी क्षेत्राशी संबंधित करिअरच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी परिक्रमा शैक्षणिक संकुलास भेट द्यावी, असे आवाहन महाविद्यालयाचे डीन डॉ. के. एस. रिसम यांनी केले आहे.

COMMENTS