Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेवगावमध्ये शेतजमिनीच्या वादातून मारहाण

शेवगाव : तालुक्यातील शेवगाव पोलीस ठाणे हद्दीत शेतजमिनीवरील पाण्याच्या वादातून एका शेतकऱ्यावर मारहाण झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलि

अन्नसुरक्षा अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे निवेदन
‘ज्ञानेश्वर’च्या तज्ज्ञ संचालकपदी डॉ.क्षितिज घुले व रवींद्र नवले
डंपरच्या मुजोरपणामुळे शेवगावकर वैतागले शहरातील वाहतूक कोंडीची समस्या कायम 

शेवगाव : तालुक्यातील शेवगाव पोलीस ठाणे हद्दीत शेतजमिनीवरील पाण्याच्या वादातून एका शेतकऱ्यावर मारहाण झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे.

 पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार मोहन दशरथ कौंसे (वय ४३, व्यवसाय – शेती, रा. शेवगाव, जि. अहिल्यानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी बंडू अर्जुन वीर (रा. शेवगाव) यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

 दि. २८ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे ८.१५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. तक्रारदार व आरोपी यांच्यामध्ये शेतजमिनीच्या बांधावरून व पाण्याच्या वापरावरून वाद निर्माण झाला. हा वाद वाढत जाऊन आरोपीने तक्रारदारास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

COMMENTS