Homeताज्या बातम्या

बालमटाकळी ते लाडजळगाव पालखी मार्गाचे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून डांबरीकरण करा

https://youtu.be/07DrtFvmxN8 श्रीक्षेत्र पैठणचे शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांची पालखी सोहळा हा पंढरीच्या दिशेने विठुरायाचा व ज्ञानोबा तुकारामा

अरणगाव शाळेत पहिलीचा प्रवेशोत्सव उत्साहात
कर्जतमधील घरकुलाच्या पहिल्या हप्त्याचे 100 टक्के वितरण : अजिंक्य सूर्यवंशी; ३१ मार्चपूर्वी काम सुरू न केल्यास मंजुरी रद्द
डिझेलसाठी ‘सातबारा’ मागणाऱ्या पंप चालकांवर तातडीने कारवाई करा; डॉ. अजित नवलेंची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी!

श्रीक्षेत्र पैठणचे शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांची पालखी सोहळा हा पंढरीच्या दिशेने विठुरायाचा व ज्ञानोबा तुकारामाचा गजर करीत निघालेला आहे , एकनाथ महाराजांचा पायी पालखी सोहळा बोधेगाव पासुन बालमटाकळी मार्गे बाडगव्हाण व लाडजळगांव ला जात असतो परंतु बालमटाकळी ते लाडजळगांव हा रस्ता पायी पालखीसाठी अत्यंत खडतर असून प्रशासनाकडून तात्पुरता दुरुस्त केल्या जात असल्याने तो रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून डांबरीकरण करण्याची मागणी पैठणचे एकनाथ महाराज पालखीचे चालक रघुनाथ महाराज पालखी वाले यांनी केली आहे ,
शेवगांव तालुक्याच्या बालमटाकळी येथून शांती ब्रह्म एकनाथ महाराज पालखी सोहळा हा बाडगव्हाण मार्गे लाड जळगाव रस्त्याने परंतु अत्यंत खडसर रस्त्याने जात असल्याने दरवर्षी प्रशासनाच्या माध्यमातून रस्त्याची फक्त दुरुस्ती केली जात असून यावर्षी जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके , गटविकास अधिकारी सोनल शहा यांनी या रस्त्याची पाहणी करून पालखीला रस्त्यात अडथळा येणार नाही त्या पद्धतीने दुरुस्ती केली. मात्र पालखी चालक रघुनाथ महाराज पालखीवाले यांनी लाड जळगाव ग्रुप ग्रामपंचायत सरपंच अंबादास ढाकणे यांच्याकडे हा रस्ता डांबरीकरण करून पुढील वर्षी हा रस्ता चांगल्या पद्धतीचा प्रशासनाने करून द्यावा अशी ही मागणी करून या खडतर रस्त्याविषयी खंत व्यक्त केली .

COMMENTS