Homeताज्या बातम्या

आष्टीच्या डी. फार्मसी कॉलेजचा निकाल उत्कृष्ट; प्रथम वर्ष १०० टक्के तर द्वितीय वर्षाचा ९८ टक्के निकाल

आष्टी: आनंद चॅरिटेबल संस्था संचलित कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अँड रिसर्च (डी. फार्मसी, बी. फार्मसी, एम. फार्मसी), आष्टी येथील डी. फार्मसी विद

महिला कला महाविद्यालयात मा. अशोकरावजी पाटील (दादा) यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
मुक्त पत्रकारितेच्या शिरपेचात मानाचा सातवा तुरा
लग्नपत्रिकेवर जन्मतारीख छापण्याचा निर्णय महत्त्वपूर्ण; सामाजिक कार्यकर्ते डॉ. गावीत्रे यांनी केले स्वागत

आष्टी: आनंद चॅरिटेबल संस्था संचलित कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अँड रिसर्च (डी. फार्मसी, बी. फार्मसी, एम. फार्मसी), आष्टी येथील डी. फार्मसी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्या उन्हाळी २०२६ परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. प्रथम वर्षाचा १०० टक्के तर द्वितीय वर्षाचा ९८ टक्के निकाल लागला असून विद्यार्थ्यांनी गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे.

गुणवंत विद्यार्थ्यांची नेत्रदीपक कामगिरी

प्रथम वर्ष डी. फार्मसीमध्ये कु. शिंदे स्नेहल संदीप हिने ८३.३० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. त्यापाठोपाठ कु. शेंडगे कीर्ती कृष्णा (८१.९० टक्के) द्वितीय, कु. सापते संस्कृती संजय (८०.३० टक्के) तृतीय, जाधव सपना ईश्वर (७९.४० टक्के) चतुर्थ तर कु. ओव्हाळ अपेक्षा कल्याण (७९.३० टक्के) हिने पाचवा क्रमांक मिळवला.

द्वितीय वर्ष डी. फार्मसीमध्ये कु. कांबळे मानसी सुनील हिने ८३.६४ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला. कु. कटारनवरे श्रद्धा मोहन (८३.२७ टक्के) द्वितीय, कु. गंभीरे धनश्री हनुमान (८२.५५ टक्के) तृतीय, कु. झांबरे प्रीती नवनाथ (८२.०९ टक्के) चतुर्थ आणि कु. शिंदे निकिता किसन (८१.६४ टक्के) हिने पाचवा क्रमांक पटकावला.

ग्रामीण भागात शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा

सन २००६ मध्ये संस्थापक अध्यक्ष मा. भीमरावजी धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या या फार्मसी कॉलेजने ग्रामीण भागात शैक्षणिक गुणवत्तेचा मोठा ठसा उमटवला आहे. नियमित अध्यापन, प्रात्यक्षिके, सुसज्ज ग्रंथालय, संगणक कक्ष, तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन, औषधनिर्मिती कंपन्यांना भेटी, संशोधनाला प्रोत्साहन, कॅम्पस इंटरव्ह्यू व सामाजिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना येथे व्यापक संधी उपलब्ध होत आहेत.

या घवघवीत यशाबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थापक अध्यक्ष भीमरावजी धोंडे, सहसचिव डॉ. अजयदादा धोंडे, संचालक अभयराजे धोंडे, प्रशासन अधिकारी डॉ. डी. बी. राऊत यांच्यासह शिक्षक व कर्मचार्‍यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. दर्जेदार शिक्षण, विद्यार्थी केंद्रित उपक्रम आणि संशोधनाला दिले जाणारे प्रोत्साहन हेच या यशामागील प्रमुख घटक असल्याचे कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुनील कोल्हे यांनी सांगितले.

COMMENTS