व्हाइटहेड्सच्या समस्येमुळे हैराण असाल, तर हे घरगुती उपाय जरूर करा !

Homeमनोरंजनलाईफस्टाईल

व्हाइटहेड्सच्या समस्येमुळे हैराण असाल, तर हे घरगुती उपाय जरूर करा !

व्हाइटहेड्स या समस्येमुळे हैराण ?

अनेक लोकांना चेहेऱ्यावरील व्हाइटहेड्स(Whiteheads) चा त्रास असतो. धूळ, प्रदूषण यामुळे त्वचा खराब होतेच, त्यासोबतच व्हाइटहेड्सही वाढतात. त्वचेवरील अतिर

‘बॉलिवूडमध्ये नायिकांसोबत नेहमीच भेदभाव’
आजचे राशीचक्र रविवार,०९ जानेवारी २०२२ अवश्य पहा | LokNews24
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरात अखेर लग्नबंधनात अडकली.

अनेक लोकांना चेहेऱ्यावरील व्हाइटहेड्स(Whiteheads) चा त्रास असतो. धूळ, प्रदूषण यामुळे त्वचा खराब होतेच, त्यासोबतच व्हाइटहेड्सही वाढतात. त्वचेवरील अतिरिक्त तेल(extra oil) आणि मृत पेशीं(dead cells) मुळे त्वचेच्या छिद्रां(Skin pores) पर्यंत हवा पोहोचत नाही त्यामुळेच व्हाइटहेड्सही वाढतात. त्यासाठी घरात उपलब्ध असलेल्या दैनंदिन वापरातील अनेक गोष्टी वापरून व्हाइटहेड्स काढता येतात. कोरफड,(aloe vera) मध,(Honey) हळदीचा लेप,(Turmeric coating) ओट्स स्क्रव(Oats screw) असे अनेक पदार्थ आपण वापरू शकतो. व्हाइटहेड्स रिमूव्हल मास्क(Whiteheads Removal Mask) कसा तयार करायचा, हे आपण पाहूया.

१. कोरफडीचा रस ( ॲलोव्हेरा जेल)

कोरफडीचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. कोरफडीच्या रसामुळे चेहऱ्यावरील अधिकचे तेल निघून जाण्यास मदत होते. व्हाइटहेड्स(Whiteheads) ची समस्या दूर करण्यासाठी एका वाटीत एक चमचा ॲलोव्हेरा जेल(Aloe vera gel) घ्यावे. त्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस (Lemon juice) घालावा. हे मिश्रण एकत्र करून चेहेऱ्यावर 10 मिनिटे लावून ठेवावे. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवून टाकावे. या मिश्रणामुळे व्हाइटहेड्स(Whiteheads) ची समस्या दूर होण्यास मदत होईल.

कोरफडीच्या रसामुळे चेहऱ्यावरील तेल कमी होण्यास मदत 
ॲलोव्हेरा जेल आणि  लिंबाचा रस यांचे मिश्रण वापरणे 

२. मध (Honey)

 मधामुळे केवळ व्हाइटहेड्सची समस्या दूर होत नाही तर त्यामुळे त्वचा मऊसूत आणि चमकदारही होते. यासाठी मध थोडासा गरम करावा. त्यानंतर तो व्हाइटहेड्स झालेल्या जागी थोडा वेळ लावून ठेवावा. 20 मिनिटांनी कोमट पाण्याने हे मिश्रण धुवून टाकावे आणि मऊ फडक्याने चेहरा स्वच्छ पुसून घ्यावा. यामुळे तुमचे व्हाइटहेड्स निघून जातीलच पण तुमची त्वचा मऊ आणि चमकदार होईल.

व्हाइटहेड्स ची समस्या दूर करण्यासाठी मध उपयुक्त 

३. ओट्स स्क्रब (Oats scrub)

व्हाइटहेड्स दूर करण्यासाठी ओट्स स्क्रब(Oats scrub) चा वापर करता येऊ शकतो. एका बाऊलमध्ये 2 चमचे ओट्स, अर्धा चमचा मध आणि लिंबाचा रस मिसळा. हे सर्व मिश्रण चांगल्या रितीने एकत्र करा. आता हा स्क्रब चेहऱ्यावर लावा आणि 5 मिनिटे स्क्रबिंग करत रहा. थोड्या वेळाने चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा.

व्हाइटहेड्स दूर करण्यासाठी ओट्स स्क्रबचा वापर करणे 
 ओट्स,मध आणि लिंबाचा रस यांचे मिश्रण वापरणे 

४. हळदीचा लेप( Turmeric coating)

व्हाइटहेड्स दूर करण्यासाठी हळदीचा लेप उपयुक्त ठरू शकतो. एका वाटीत अर्धा चमचा हळद घेऊन त्यात एक चमचा मध मिसळा. हे मिश्रण नीट एकत्र करून व्हाइटहेड्स झालेल्या जागी नीट लावा. 15 मिनिटांनी हा लेप स्वच्छ पाण्याने धुवून टाका. हा लेप नियमितपणे वापरल्यास व्हाइटहेड्सची समस्या दूर होईल.

व्हाइटहेड्स दूर करण्यासाठी हळदीच लेप उपयुक्त 

COMMENTS