Homeताज्या बातम्या

पाथर्डीतील कीर्तनवाडीत सशस्त्र दरोडाचाकूचा धाक दाखवत मारहाण, साडेचार लाखांचा ऐवज लंपास

पाथर्डी : तालुक्यातील खरवंडी कासार शिवारातील कीर्तनवाडी येथे सात जणांच्या दरोडेखोरांच्या टोळीने मंगळवारी मध्यरात्रीनंतर धाडसी दरोडा टाकत तीन घरां

पाण्याच्या वादातून कुऱ्हाडीने हल्ला; लोहगाव शिवारातील घटनेप्रकरणी दोघांवर सोनईत गुन्हा दाखल
वृद्धांसाठी घरपोच ‘हयाती’ची नोंदणी; कर्जतमधील नगरसेविका नीता कचरे यांचा अनोखा उपक्रम
प्रशिक्षणादरम्यान पोलीस मुख्यालयात ‘हँडग्रेनेड’चा स्फोट; चार प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी जखमी, प्रकृती स्थिर


पाथर्डी : तालुक्यातील खरवंडी कासार शिवारातील कीर्तनवाडी येथे सात जणांच्या दरोडेखोरांच्या टोळीने मंगळवारी मध्यरात्रीनंतर धाडसी दरोडा टाकत तीन घरांना लक्ष्य केले. या घटनेत सोने, चांदी आणि रोख रक्कम असा सुमारे साडेचार लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. दरोडेखोरांनी घरातील सदस्यांना धारदार शस्त्रांचा धाक दाखवत मारहाण केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन तसेच अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैभव कलबुर्मे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच स्थानिक पोलिसांना तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या. याप्रकरणी रावसाहेब बाजीराव कीर्तने यांनी अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध पाथर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री कीर्तने कुटुंबीय झोपेत असताना पहाटेच्या सुमारास दरोडेखोरांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून प्रवेश केला. घरातील कपाटे फोडून त्यांनी दागिने व रोख रक्कम शोधण्यास सुरुवात केली. यावेळी रावसाहेब कीर्तने यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोरांनी लोखंडी गज व धारदार शस्त्राने मारहाण केली. तसेच त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी आणि हातातील अंगठी हिसकावून घेतली. पत्नी, मुलगा आणि सुनेलाही मारहाण करून अंगावरील व कपाटातील दागिने लुटण्यात आले.
दरम्यान, सागर कीर्तने यांनी भ्रमणध्वनीद्वारे गावकऱ्यांना माहिती दिल्यानंतर ग्रामस्थ घटनास्थळी धावले. त्यामुळे दरोडेखोरांनी तेथून पळ काढला. मात्र, त्यानंतर त्यांनी जवळच असलेल्या बाबासाहेब दशरथ बटुळे यांच्या घरावरही धाड टाकली. बटुळे दांपत्याला मारहाण करून सुमारे एक लाख ६३ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि ४० हजार रुपयांची रोख रक्कम लंपास करण्यात आली. याच टोळीने भागवत बटुळे आणि शांताराम बटुळे यांच्या घरातही चोरीचा प्रयत्न केला; मात्र तो फसला.
 या धाडसी दरोड्यामुळे कीर्तनवाडीसह परिसरात खळबळ उडाली असून दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक संयुक्तपणे तपास करीत आहे

COMMENTS