Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रशिक्षणादरम्यान पोलीस मुख्यालयात ‘हँडग्रेनेड’चा स्फोट; चार प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी जखमी, प्रकृती स्थिर

अहिल्यानगर : आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्जता म्हणून घेतल्या जाणाऱ्या मॉक ड्रिलदरम्यान अहिल्यानगरमध्ये मोठी दुर्दैवी दुर्घटना घडली आ

विषारी दारूमुळे मृतांची संख्या २२ वर; गावरान दारूमध्ये ‘मिथेनॉल’ मिसळल्याने अनेकांचा मृत्यू
पाण्याच्या वादातून कुऱ्हाडीने हल्ला; लोहगाव शिवारातील घटनेप्रकरणी दोघांवर सोनईत गुन्हा दाखल
वृद्धांसाठी घरपोच ‘हयाती’ची नोंदणी; कर्जतमधील नगरसेविका नीता कचरे यांचा अनोखा उपक्रम

अहिल्यानगर : आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्जता म्हणून घेतल्या जाणाऱ्या मॉक ड्रिलदरम्यान अहिल्यानगरमध्ये मोठी दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. पोलीस मुख्यालयात प्रात्यक्षिके सुरू असताना अचानक हँडग्रेनेडचा स्फोट झाला. या दुर्घटनेत चार प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे पोलीस दलासह संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

कोणतीही आणीबाणीची किंवा घातपाताची परिस्थिती उद्भवल्यास परिस्थिती कशी हाताळावी, याचे धडे देण्यासाठी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. शस्त्रास्त्रे हाताळण्याचे प्रशिक्षण सुरू असतानाच अचानक एका हँडग्रेनेडचा जोरदार स्फोट झाला.

या दुर्दैवी घटनेत शिवराज पवार, शुभम कावरे, गणेश मढे आणि योगेश सोळुंके हे चार प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. स्फोट झाला तेव्हा ग्रेनेड अगदी जवळ असल्याने दोन कर्मचाऱ्यांच्या हाताची करंगळी तुटली आहे, तर इतर दोन कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने, सर्व जखमी कर्मचाऱ्यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर शहरातील एका खाजगी रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

जागेवरच हातात स्फोट! “आमचा मॉक ड्रिलचा डेमो सुरू होता. आमच्या हातात ग्रेनेड होते. ते कसे फोडायचे, काय करायचे, हे काहीच आम्हाला पूर्णपणे सांगितलं नव्हतं. ऑर्डर आल्यावर पिन ओढली आणि जागेवर हातात ब्लास्ट झाला. माझी करंगळी तुटली आणि डोळ्यात धूर गेला,” अशी आपबिती जखमी पोलीस कर्मचाऱ्याने सांगितली. सूचना होत्या, पण संपूर्ण माहिती दिली नसल्याने हा अपघात घडल्याचा आरोप जखमी कर्मचाऱ्यांनी केला आहे.

COMMENTS