Homeताज्या बातम्या

 विटंबना प्रकरणातील आरोपीची माहिती देणाऱ्यास ११ हजारांचे बक्षीस

देवळाली प्रवरा : राहुरी शहरातील श्री बुवासिंध बाबा तालीम परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या विटंबना प्रकरणातील आर

कर्जत-मिरजगाव परिसरात दारू विक्रेत्यांवर कारवाई  ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त मोहीम
शिर्डी-नाशिक महामार्गावर बस-कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, १५ जखमी
पाथर्डी पोलिसांचा अवैध दारू व्यवसायावर छापा; गावठी हातभट्टी उद्ध्वस्त करून आरोपीला अटक


देवळाली प्रवरा : राहुरी शहरातील श्री बुवासिंध बाबा तालीम परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या विटंबना प्रकरणातील आरोपीचा शोध अद्याप लागलेला नसताना, यापूर्वी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी जाहीर केलेल्या एक लाख रुपयांच्या बक्षिसानंतरही कोणतीही ठोस माहिती समोर आली नव्हती. अशा परिस्थितीत राहुरी पोलिसांनी आता आरोपीबाबत माहिती देणाऱ्यास ११ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले असून, “एक लाख रुपयांत माहिती मिळाली नाही, तर आता ११ हजारांत आरोपीचा सुगावा लागणार का?” असा सवाल शिवप्रेमी संघटनांकडून उपस्थित केला जात आहे.
 २६ मार्च २०२५ रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याची विटंबना केली होती. या घटनेनंतर राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेमुळे राहुरी शहरासह परिसरात संतापाची लाट उसळली होती.
राहुरी पोलिसांनी आरोपीबाबत खात्रीलायक माहिती देणाऱ्यास ११ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी सांगितले.
माहिती देण्यासाठी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे (मो. ८४२४०४२४४६) अथवा राहुरी पोलीस ठाणे (दूरध्वनी : ०२४२६-२३२४३३) येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणातील तपासाबाबत शिवप्रेमी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करूनही आरोपीबाबत माहिती पुढे आली नसताना आता पोलिसांच्या ११ हजार रुपयांच्या बक्षिसामुळे तपासाला काही दिशा मिळते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS