नागपुरात आढळला ओमिक्रोनचा पहिला रुग्ण

Homeताज्या बातम्या

नागपुरात आढळला ओमिक्रोनचा पहिला रुग्ण

नागपूर : जगभर हैदोस घालणारा कोरोना विषाणुचा ओमिक्रोन स्टेन नागपुरात येवून ठेपला आहे. नागपुरातील एका रुग्णाला ओमिक्रोनचा प्रादुर्भाव झाल्याची माहिती प

गाव तिथे विलगीकरण केंद्र सुरू करावे- विवेक कोल्हे
आमचे कर, भाडे व कामगारांचे पगार कोण देणार? ; व्यापारी-कामगारांचा महाविकास आघाडीला सवाल
पाच महसूल मंडळाचा समावेश करून शेतकर्‍यांना भरपाई द्या

नागपूर : जगभर हैदोस घालणारा कोरोना विषाणुचा ओमिक्रोन स्टेन नागपुरात येवून ठेपला आहे. नागपुरातील एका रुग्णाला ओमिक्रोनचा प्रादुर्भाव झाल्याची माहिती पुढे आली आहे. यासंदर्भात माहिती देताना नागपुरातील एम्स रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले की, सदर 40 वर्षीय रुग्ण काही दिवसांपूर्वी दक्षिण अफ्रिकेहून परतला होता. गेल्या 8 दिवसांपासून सदर रुग्ण गृहविलगीकरणात होता. यादरम्यान केलेल्या चाचणीत हा रूग्ण पॉझिटिव्ह असून त्याला ओमिक्रोन स्टेनचा प्रादुर्भाव झाल्याचे स्पष्ट झाले. सदर रुग्णास नागपुरातील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी रुग्णाच्या कुटुंबातील इतर सदस्यांची आरटी पीसीआर टेस्ट करण्यात आली. मात्र, ते सर्वजण निगेटिव्ह आढळून आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

COMMENTS