Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

यंदा 50 हजार गोविंदांना मिळणार विमा संरक्षण

प्रत्येकाला दहा लाखांचे विमा संरक्षण

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात काही दिवसांवर दहीहंडी उत्सव येवून ठेपला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर यंदा राज्यातील 50 हजार गोविंदांना विमा संरक्षण देण्याच

वडगाव माहूरे येथील नागरिकांचे बेमुदत उपोषण अखेर 9 व्या दिवशी सुटले 
जेजुरी गडावर भाविकांची अलोट गर्दी
वंचित बहुजन आघाडीचा ओबीसी संवाद उत्साहात

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात काही दिवसांवर दहीहंडी उत्सव येवून ठेपला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर यंदा राज्यातील 50 हजार गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गोविंदांना मानवी मनोरे रचताना अपघाती मृत्यू, दोन अवयव अथवा डोळे निकामी झाल्यास दहा लाखांचे विमा संरक्षण देण्यात येणार आहे.
यंदाच्या उत्सवासाठी गोविंदांना 8 सप्टेंबर 2023 सायंकाळी 6 वाजेपर्यंत विमा संरक्षण राहणार आहे. अपघाती मृत्यू दोन अवयव अथवा दोन डोळे गमावल्यास तसेच कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्व आले असल्यास दहा लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे. एक हात, एक पाय किंवा एक डोळा गमावल्यास पाच लाख रुपयांचे विमा संरक्षण असणार आहे. अपघातामुळे रुग्णालयातील उपचारांसाठी झालेला खर्च किंवा जास्तीत जास्त एक लाखांचे विमा संरक्षण असेल. तर कायमस्वरूपी अपूर्ण अपंगत्वासाठी विमा पॉलिसीत नमूद केलेल्या टक्केवारीनुसार विमा संरक्षण दिले जाणार आहे. यासंदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शासन निर्णय जारी केला आहे. गोविंदांचे विमा संरक्षण ओरिएन्टल इन्शुरन्स विमा कंपनीच्या माध्यमातून उतरविला जाणार आहे. एकूण 50 हजार गोविंदांचा विमा काढण्यात येणार आहे.

COMMENTS