अकोले : “आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे. गावाच्या मर्यादेत न राहता विविध नामांकित औद्योगिक क्षेत्रांमध्ये उपलब्ध

अकोले : “आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे. गावाच्या मर्यादेत न राहता विविध नामांकित औद्योगिक क्षेत्रांमध्ये उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा. कौशल्याधारित शिक्षणामुळे युवकांना उज्ज्वल भविष्य घडविण्याची संधी उपलब्ध होऊ शकते.” असे प्रतिपादन आमदार डॉ. लहामटे यांनी केले.
क्रांतिकारक राघोजी भांगरे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिक्षक एस. के. मंडलिक हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या सेवापूर्तीप्रित्यर्थ कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी अकोलेचे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या हस्ते मंडलिक दाम्पत्याचा सत्कार करून गौरव करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाच्या नाशिक प्रादेशिक कार्यालयाचे उपसंचालक राजेश मानकर होते. त्यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बदलत्या तंत्रज्ञानाशी सुसंगत ज्ञान आत्मसात करण्याचे महत्त्व विशद केले. स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी नवनवीन तांत्रिक बाबींचा सातत्याने अभ्यास करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेचे गट निदेशक ए. सी. नागरे यांनी मंडलिक यांच्या सेवाप्रवासाचा आढावा घेतला.
यावेळी एन. एम. देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य बी. वाय. देशमुख, संजय कुटे, राजेश खोजे, उमेश पालवे, प्रल्हाद धुमाळ, मंगेश मरकड, प्रदीप भाटे, बाळासाहेब ताजणे आदींनी मनोगते व्यक्त केली.
समारंभास दत्ताजी निगळे, प्राध्यापक गुलाब मंडलिक, बी. के. बनकर, डॉ. फटांगरे यांच्यासह अकोले व राजुर परिसरातील नागरिक, मंडलिक व गीते परिवारातील सदस्य, पालक, संस्थेतील शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन अमित पालवे यांनी तर प्राचार्य जगदीश गवळी यांनी आभार मानले.

COMMENTS