Homeताज्या बातम्या

माजलगाव-वडवणी-धारूर मतदारसंघातील जि.प.शाळांसाठी 15.80 कोटींच्या निधीची मागणी

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुरक्षित, सुसज्ज आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी माजलगाव-वडवणी-धारूर मतदारसंघातील जिल्

आदित्य नर्सिंग महाविद्यालयाचा 7 व्या सत्राचा निकाल 100 टक्केयशस्वी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सन्मान
मच्छिंद्र चाकणे यांचा सत्कार
आढळगाव शाळेला नवे वर्ग; वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी २४ लाखांची मंजुरी



ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुरक्षित, सुसज्ज आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी माजलगाव-वडवणी-धारूर मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांमधील इमारतविरहित शाळा, मोडकळीस आलेल्या वर्गखोल्या, अतिरिक्त वर्गखोल्यांचे बांधकाम तसेच जीर्ण वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी एकूण 15 कोटी 80 लाख रुपयांच्या निधीची तरतूद जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या निधीतून करण्यात यावी, अशी मागणी डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, माजलगाव तालुक्यातील 226 जिल्हा परिषद शाळांपैकी 3 इमारतविरहित शाळांसाठी 3 नवीन वर्गखोल्या, 9 शाळांतील 12 मोडकळीस आलेल्या वर्गखोल्यांचे पुनर्बांधकाम आणि 6 शाळांमध्ये 8 अतिरिक्त वर्गखोल्यांची आवश्यकता आहे. यासाठी बांधकामासाठी 2 कोटी 76 लाख रुपये व दुरुस्तीसाठी 1 कोटी 22 लाख 50 हजार रुपये, असा एकूण 3 कोटी 98 लाख 50 हजार रुपयांचा निधी आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. वडवणी तालुक्यातील 100 जिल्हा परिषद शाळांमध्ये 14 शाळांतील 31 मोडकळीस आलेल्या वर्गखोल्यांचे पुनर्बांधकाम तसेच 5 शाळांमध्ये 7 अतिरिक्त वर्गखोल्यांचे बांधकाम आवश्यक आहे. यासाठी 4 कोटी 56 लाख रुपये बांधकामासाठी आणि 1 कोटी 68 लाख रुपये दुरुस्तीसाठी, असा एकूण 6 कोटी 24 लाख रुपयांचा निधी आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे. धारूर तालुक्यातील 129 जिल्हा परिषद शाळांमध्ये 9 इमारतविरहित शाळांसाठी 9 वर्गखोल्या, 8 शाळांतील 16 मोडकळीस आलेल्या वर्गखोल्यांचे पुनर्बांधकाम तसेच 4 शाळांमध्ये 10 अतिरिक्त वर्गखोल्यांची गरज आहे. यासाठी बांधकामासाठी 4 कोटी 20 लाख रुपये आणि दुरुस्तीसाठी 1 कोटी 37 लाख 50 हजार रुपये, असा एकूण 5 कोटी 57 लाख 50 हजार रुपयांचा निधी आवश्यक असल्याचे डॉ. ढवळे यांनी नमूद केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुरक्षित व दर्जेदार शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या निधीतून या सर्व कामांना प्राधान्याने मंजुरी देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी डॉ. गणेश ढवळे यांनी केली आहे.
मतदारसंघनिहाय निधीची आवश्यकता :
माजलगाव – 3 कोटी 98 लाख 50 हजार रुपये, वडवणी – 6 कोटी 24 लाख रुपये, धारूर – 5 कोटी 57 लाख 50 हजार रुपये, एकूण आवश्यक निधी : 15 कोटी 80 लाख रुपये
प्रमुख मागण्या :
इमारतविरहित शाळांसाठी नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम, मोडकळीस आलेल्या वर्गखोल्यांचे पुनर्बांधकाम, वाढत्या विद्यार्थी संख्येनुसार अतिरिक्त वर्गखोल्या, जीर्ण वर्गखोल्यांची दुरुस्ती

COMMENTS