दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात दाम्पत्यासह नदीत कोसळली कार.

Homeताज्या बातम्या

दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात दाम्पत्यासह नदीत कोसळली कार.

सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

कोल्हापुर प्रतिनिधी- समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात एक कार थेट नदीमध्ये कोसळली. ही घटना कोल्हापूरा(Kolhapur) तील चंदगड(Chandg

समृद्धीवर मध्यरात्री मृत्युचे तांडव
शिरवळ येथे महामार्गावर भीषण अपघात
नगर-मनमाड रस्ता दुरुस्ती निकृष्ट पद्धतीने

कोल्हापुर प्रतिनिधी- समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात एक कार थेट नदीमध्ये कोसळली. ही घटना कोल्हापूरा(Kolhapur) तील चंदगड(Chandgarh) तालुक्यातील मजरे कारवे(Mazre Karave) येथे घडली . घटनेनंतर मदतीसाठी तत्काळ लोकांनी धाव घेतल्याने सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. कल्लाप्पा बाणेकर(Kallappa Banekar) रेश्मा बाणेकर(Reshma Banekar) हे दाम्पत्य आपल्या गावी मुरकुटेवाडी(Murkutewadi) कडे निघालं होतं. त्यावेळी समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचविताना कलाप्पा यांचं कारवरील नियंत्रण सुटलंत्यामुळे कार बेळगाव-वेंगुर्ला(Belgaum-Vengurla) रोडवर असलेल्या हांजहोळ नदी(Hanjhol River) जवळील पुलाजवळून नदीत कोसळली. लोकांनी क्षणाचाही विचार न करता नदीत उतरुन कारमधील दाम्पत्याला बाहेर काढलं. त्यामुळे सुदैवाने जिवीतहानी टळली.

कोल्हापुरातील घटनेचा व्हिडीओ .

COMMENTS