Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिंदाल कंपनी आग प्रकरणी ७ जणांविरुध्द घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  इगतपुरी प्रतिनिधी - १ जानेवारीला नाशिक जिल्ह्यातील मुंढेगाव येथील जिंदाल कंपनीमध्ये मोठ्या स्वरुपात आग लागली होती. ह्या घटनेमध्ये ३ कामगार

राज्यसभेसाठी काँग्रेसच्या उमेदवाराचा मार्ग मोकळा… भाजपची माघार
संजय राऊत यांना 8 ऑगस्टपर्यंत कोठडी.
‘कुटासा इको टुरिझम’च्या प्रस्तावाला गती द्या ; राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश

  इगतपुरी प्रतिनिधी – १ जानेवारीला नाशिक जिल्ह्यातील मुंढेगाव येथील जिंदाल कंपनीमध्ये मोठ्या स्वरुपात आग लागली होती. ह्या घटनेमध्ये ३ कामगार महिमा कुमारी प्रल्हाद सिंग, अंजली रामकुबेर यादव, सुधीर लालताप्रसाद मिश्रा हे मयत झाले होते. ह्यामध्ये २२ कामगार जखमी झाले होते. घोटी पोलीस स्टेशन येथे ह्या घटनेबाबत अकस्मात मृत्यु, अकस्मात जळीत दाखल करण्यात आले होते. अकस्मात जळीताची चौकशी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर हे करीत होते. अकस्मात जळीताच्या चौकशीचे अनुषंगाने औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग, नाशिक व संबधित विभागांना पत्रव्यवहार करुन अहवाल मागविण्यात आले होते. त्याचबरोबर कंपनीचे सेफ्टी ऑडीट रिपोर्ट व इतर कागदपत्रे प्राप्त करण्यात आली होती. सर्व कागदपत्रांचे अवलोकन करता, ज्या बॅच पॉली प्लॅन्टमध्ये प्रथमतः आग लागली होती, तो बॅच पॉली प्लॅन्ट हा सुमारे दिड महिन्यांपासुन बंद होता. सदर प्लॅन्ट सुरु करण्यापुर्वी त्याची तपासणी व दुरुस्ती होवुन, तो सुरु करताना SOP चे पालन न केल्याने, प्लॅन्टमधून थर्मिक फ्लुईड ऑइलची गळती होवुन सदरची आग लागल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर आगीत १ पुरुष व २ महिला कामगार यांचे मरणास व कंपनीचे इतर २२ कामगारांच्या दुखापतीस जिंदाल पॉली फिल्म प्रा. लि. कंपनीचे भोगवटादार, फॅक्टरी मॅनेजर, पॉली फिल्म प्लॅन्ट बिजनेस हेड, प्रोडक्शन मॅनेजर, मेन्टेन्सस विभाग प्रमुख, प्रोडक्शन डिपार्टमेंट शिफ्ट इंचार्ज आणि प्लॅन्ट ऑपरेटर हे ७ इसम जबाबदार आहे. म्हणून त्यांच्याविरुध्द घोटीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार घोटी पोलीस स्टेशन येथे गुरनं. ८५ / २०२३ भादवि कलम ३०४(अ), ३३७, ३३८, २८५, २८७, ३४ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. ह्या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी, नाशिक ग्रामीण अर्जुन भोसले हे करीत आहेत.

COMMENTS